Netanyahu says America cannot control Israel they are partners
Israel America Relations : इस्रायल आणि अमेरिका संबंधामध्ये नवे वळण दिसून येत आहे. गाझातील युद्धबंदीवरुन इस्रालचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अनेक प्रयत्नानंतर इस्रायल आणि हमासमध्ये काही काळासाठी युद्धबंदी लागू करण्यात आली होती. परंतु आता ही युद्धबंदी तुटण्याच्या मार्गावर आहे. याच पार्श्वभूमीवर नेतन्याहूंनी एक खळबळजनक विधान केले आहे.
गाझातील सध्याच्या बिघडती परिस्थिती पाहता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वेंस आणि नेतन्याहू यांच्या बुधवारी (२२ ऑक्टोबर) महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत गाझातील युद्धबंदी अधिक काठ ठेवण्यावर चर्चा झाली. परंतु यावेळी नेतन्याहूंनी अमेरिकेवर तीव्र हल्ला चढवला.
त्यांनी म्हटले की, इस्रायल कोणाचाही गुलाम नाही, तसेच इस्रायल स्वत:चे रक्षण स्वत:च करु शकतो, आणि ते कसे तो स्वत: ठरवेल. अमेरिका इस्रायल चालवतो किंवा इस्रायल अमेरिकेच्या तालावर नाचतो अशी अफवा निरर्थक आहेत. त्यांनी असेही स्पष्ट केले की, दोन्ही देश समान भागीदार आणि आमचे संबंध मध्यपूर्वेचा चेहराच बदलत आहे. नेतन्याहूंच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे.
यावर जेडी व्हॅन्स यांनी गाझामध्ये शांतता राखणे हे अत्यंत कठीण आणि मोठे आव्हानं असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, हमासने शस्त्र खाली ठेवून गाझाच्या विकासासाठी सहकार्य करावे, नाहीतर पुन्हा दीर्घकाळ संघर्ष सुरु होऊ शकतो. पण त्यांनी इस्रायलकडूनही हीच अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही बाजूंनी माघार घेतली गेली तर गाझात शांतता प्रस्थापित होईल असे व्हॅन्स यांनी म्हटले.
गाझातील युद्धबंदी मोडणार इस्रायल?
दरम्यान नेतन्याहूंच्या या वादग्रस्त विधानाने इस्रायल गाझा युद्धविरामातून माघार घेईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे अमेरिकन प्रशासन चिंतेत आहे. तज्ज्ञांच्या मते, इस्रायल युद्धविराम मोडण्याची शक्यता आहे, असे झाल्या, मध्यपूर्वेत पुन्हा विनाशाचे संकट येईल. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प नेतन्याहूंच्या या भूमिकेला कसे उत्तर देताता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले युद्ध पुन्हा तीव्र झाले तर गंभीर विनाश होण्याची शक्यता आहे. सध्या गाझातील अनेक भागांमध्ये इस्रायल हमास युद्धामुळे (Israel Hamas War) प्रचंड नुकसान झाले आहे. गाझातील पायाभूत सुविधा, अन्न-पाणी, निवार, रोजगाराच्या सर्व सुविधा नष्ट झाल्या आहेत. लोक उपासमारीने मरत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. जेडी व्हॅन्स इस्रायलमध्ये कशासाठी गेले होते?
जेडी व्हॅन्स यांनी इस्रायलमध्ये नेतन्याहूंची भेट घेतली. त्यांनी नेतन्याहूंशी गाझातील युद्धविराम वाढवण्यावर चर्चा करण्यासाठी इस्रायलला गेले होते.
प्रश्न २. नेतन्याहूंनी गाझातील युद्धविरामावरुन व्हॅन्स यांना काय उत्तर दिले?
नेतन्याहूंनी गाझातील युद्धविरामावरुन वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी इस्रायल अमेरिकाचा गुलाम नसल्याचे आणि स्वत:चे रक्षण करु शकतो असे म्हटले आहे.
पृथ्वीभोवती आता दोन चंद्र! नासाने लावला ‘Quasi Moon’ चा शोध; जाणून घ्या काय आहे हे अद्भुत रहस्य?