पृथ्वीभोवती आता दोन चंद्र! नासाने लावला 'Quasi Moon' शोध; जाणून घ्या काय आहे हे अद्भुत रहस्य? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Quasi Moon or Mini Moon : नवी दिल्ली : आपल्या पृथ्वीवर अशी अनेक रहस्ये आहेत, ज्याचा शोध अद्याप लागलेला नाही. आजही आपले शास्त्रज्ञ अशा गोष्टींचा शोध घेत आहेत. सध्या नासाने आणखी एक नवीन शोध लावला आहे. आपल्या पृथ्वीला आता एक नाही तर दोन चंद्र असणार आहेत. होय तुम्ही बरोबर वाचलात. हे काल्पनिक नसून वास्त आहे.
तालिबानला मान्यता देणार का भारत? काबूलमध्ये दुतावास पुन्हा सुरु झाल्याने चर्चांना उधाण
नासाच्या खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीचा एक साथीदाराचा शोध लावला आहे. नासाला 2025 PN7 नावाचा एक लघुग्रह (Asteroid) सापडला आहे, जो पुढेल ५० वर्षे पृथ्वीच्या जवळ राहणार आहे. याला Mini Moon किंवा Quasi Moon ही म्हटले जात आहे. पण वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे की, हा लघुग्रह म्हणजेच पूर्ण चंद्र नसून केवळ अर्धाचंद्र आहे. हा अर्धचंद्र सूर्याभोवती पृथ्वीच्या सारख्याच कक्षेत आणि वेगाने फिरत आहे. यामुळे हा अर्धचंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याचा भास होत आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, या लघुग्रहाचा व्यास १९ मीटर आहे. याचा शोध ऑगस्ट २०२५ मध्ये लागला होता. नासाने दिलेल्या माहितीनुसार, हा लघुग्रह ५० वर्षे म्हणजे २०८३ पर्यंत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या प्रभावाखाली राहणार आहे. नंतर तो हळूहळू पृथ्वीपासून लांब जाईल. युरो विकलीने दिलेल्या वृत्तानुसार, हा लघुग्रह अनेक दशकांपासून पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत फिरत होता. परंतु याचा आकार आणि प्रकाश अत्यल्प असल्यामुळे याचा शोध लावणे कठीण होते. सध्या नासाचे वैज्ञानिक या लघुग्रहावरु लक्ष ठेवून आहे. यामुळे हा लघुग्रह पृथ्वीभोवती किती काळ राहिल हे निश्चित होईल.
NASA confirms that the earth actually has two moons. 🌑 A team of astronomers from Hawaii confirmed the existence of a “Quasi-Moon” officially named 2025 PN7 and is the size of a small building. It orbits the sun but appears to orbit the earth like two runners on a track.… pic.twitter.com/MWTDNnPfpm — Shipwreck (@shipwreckshow) October 20, 2025
प्रश्न १. काय आहे Quasi Moon ?
Quasi Moon हा एक लघुग्रह आहे, जो पृथ्वीभोवती सारख्या वेगाने आणि समान कक्षेत सूर्याभोवती परिक्रमा करत आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत ८ आकाराच्या वेगाने फिरत आहे.
प्रश्न २. नैसर्गिक चंद्रपेक्षा किती वेगळा आहे Quasi Moon ?
Quasi Moon हा आपल्या नैसर्गिक चंद्रापेक्षा खूप वेगळा आहे. याचा आकार अगदी लहान असून प्रकाशही अत्यल्प आहे. हा काही काळानंतर पृथ्वीपासून हळूहळू दूर जाणार आहे.
प्रश्न ३. 2025 PN7 म्हणजेच पृथ्वीचा नवा साथीदार किती काळ सूर्याभोवती फिरत राहिल?
नासाच्या माहितीनुसार, 2025 PN7 नावाचा एक लघुग्रह सापडला आहे, जो पुढेल ५० वर्षे म्हणजे २०८३ पर्यंत पृथ्वीच्या जवळ राहणार आहे.