Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Benjamin Netanyahu UN : ‘गाझामधील नरसंहाराचा आरोप म्हणजे शतकातील सर्वात मोठे खोटे’; संयुक्त राष्ट्रांत नेतान्याहूंचा रोखठोक हल्ला

Benjamin Netanyahu UN : बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना, गाझा हत्याकांडाचे आरोप हे शतकातील सर्वात मोठे खोटे असल्याचे म्हटले, इराणच्या हल्ल्याचे समर्थन केले आणि झोहरान ममदानी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी इस्लामी देशांवरही हल्लाबोल केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 25, 2026 | 12:36 PM
Benjamin Netanyahu UNGA speech UN General Assembly 2026

Benjamin Netanyahu UNGA speech UN General Assembly 2026

Follow Us
Follow Us:
  • ‘वंशसंहाराचा आरोप हे शतकातील सर्वात मोठे खोटे’
  • सभात्याग करणाऱ्या नेत्यांवर टीका
  • न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांच्यावर निशाणा

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे सध्या संयुक्त राष्ट्र महासभेचे (Benjamin Netanyahu UN) ८१ वे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात जगभरातील नेत्यांच्या उपस्थितीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भाषण केले. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी गाझामधील युद्ध, इराणवरील लष्करी कारवाया आणि पाश्चिमात्य देशांतून होणाऱ्या टीकेवर इस्रायलची बाजू मांडली. गाझामध्ये इस्रायलकडून नरसंहार (Genocide) केला जात असल्याचा दावा फेटाळताना नेतान्याहू म्हणाले की, “हे आरोप म्हणजे या शतकातील सर्वात मोठे खोटे आहे.”

नेतान्याहू आपले भाषण सुरू करण्यासाठी व्यासपीठावर आले, तेव्हाच पॅलेस्टाईनच्या आवाहनानुसार अनेक इस्लामिक आणि इतर देशांच्या प्रतिनिधींनी सभागृहातून बाहेर पडून निषेध नोंदवला. सभागृहातील बहुतेक जागा रिकाम्या झाल्याचे पाहून नेतान्याहू यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “जे प्रतिनिधी आत्ताच या सभागृहातून निघून गेले, ते नैतिकदृष्ट्या भित्रे आहेत. जर सभागृहात अजून कोणी असा नैतिकदृष्ट्या भित्रा व्यक्ती उपस्थित असेल, तर त्यांनीही कृपया बाहेर निघून जावे.” यावेळी सभागृहात विरोध आणि समर्थनाच्या घोषणाबाजीमुळे गदारोळ निर्माण झाला होता, ज्यावर महासभेचे अध्यक्ष खलील-उर-रहमान यांनी शांतता राखण्याचे वारंवार आवाहन केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PTI Protest : इस्लामाबादमध्ये होणार अंतर्गत महायुद्ध! आसिम मुनीर यांनी उभ्या केल्या कंटेनरच्या भिंती; इम्रान समर्थक बुलडोझरसह सज्ज

इराणवरील कारवाईचे समर्थन आणि गुप्त कौतुक

आपल्या भाषणात नेतान्याहू यांनी इराणवरील इस्रायली हल्ल्यांचे आणि अणू ठिकाणांवरील कारवायांचे ठामपणे समर्थन केले. इराणच्या अण्वस्त्र निर्मितीच्या धोक्याला वेळीच रोखणे हा आपल्या कार्यकाळातील सर्वात सोपा आणि महत्त्वाचा निर्णय होता, असे त्यांनी स्पष्ट केले. “इराणचा धोका फक्त इस्रायलपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण जगासाठी आहे. इस्रायल स्वतःचे संरक्षण करत असतानाच या सभागृहातून बाहेर पडलेल्या अनेक देशांनाही सुरक्षितता पुरवत आहे,” असा दावा त्यांनी केला. इतकेच नव्हे तर, “सभागृहातून सभात्याग करणाऱ्या अनेक देशांचे प्रमुख वैयक्तिक भेटीत इराणची अणू ठिकाणे नष्ट केल्याबद्दल इस्रायलचे मनापासून आभार मानतात,” असा खळबळजनक खुलासाही नेतान्याहू यांनी केला.

JUST IN: 🇮🇱🇺🇳 Benjamin Netanyahu called everyone who walked out of the UN hall COWARDS: “To all the cowards who want to leave, please do so now.” pic.twitter.com/ld4nUJvPj4 — Megatron (@Megatron_ron) September 24, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्यावर थेट आरोप

नेतान्याहू यांनी आपल्या भाषणाचा मोठा भाग न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्यावरील टीकेवर केंद्रित केला. ममदानी यांनी यापूर्वी नेतान्याहू यांना युद्धातील गुन्हेगार (War Criminal) म्हणत अटकेची मागणी केली होती आणि त्यांना न्यूयॉर्कमध्ये येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. यावर प्रत्युत्तर देताना नेतान्याहू म्हणाले, “श्री. ममदानी, तुम्ही मला इथे येण्यापासून रोखण्याचा आणि माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही सत्याचा आवाज कधीही दाबू शकत नाही.”

ममदानी महापौर झाल्यापासून न्यू यॉर्क शहरातील ज्यू समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ते स्वतःला असुरक्षित अनुभवत आहेत, असा आरोपही नेतान्याहू यांनी केला. “अनेक ज्यू नागरिक मला सांगतात की हे ते शहर राहिले नाही जे आम्ही ओळखत होतो,” असे ते म्हणाले. याशिवाय, ममदानी यांनी हमासचे समर्थन करणाऱ्या आणि ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींशी संबंध ठेवल्याचा आरोप करत, एका पॅलेस्टिनी पत्रकाराला घरी आमंत्रित केल्यावरूनही नेतान्याहू यांनी ममदानी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नेतान्याहू यांच्या या वादळी भाषणानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि मुत्सद्दी वर्तुळात पुन्हा एकदा तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: Netanyahu unga speech 2026 gaza genocide accusation zohran mamdani walkout

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • United Nations Security Council

संबंधित बातम्या

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले
1

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
2

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
3

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.