Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sweden News : होलोकॉस्ट नाकारणे आता ठरणार गुन्हा; स्वीडनच्या संसदेत घटनादुरुस्ती मंजूर

Sweden News : स्वीडनच्या संसदेने होलोकॉस्ट आणि काही अन्य आंतरराष्ट्रीय गुन्हे नाकारणाऱ्यांविरोधातील घटनादुरुस्तीला अंतिम मंजुरी दिली आहे. द्वेषपूर्ण प्रचार आणि नरसंहाराचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग स्पष्ट झाला असून हा कायदा १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 08, 2026 | 06:20 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • होलोकॉस्ट म्हणजे काय ?
  • नरसंहार नाकारण्यावरही होणार कारवाई
  • १ जानेवारी २०२७ पासून अंमलबजावणी
Sweden News : हिटलरच्या नाझी राजवटीने दुसऱ्या महायुद्धादरम्यान केलेल्या ज्यू नरसंहाराला म्हणजेच होलोकॉस्टला नाकारणाऱ्यांविरोधात स्वीडनने कठोर पाऊल उचलेले आहे . स्वीडनच्या संसदेने ४ नोव्हेंबर रोजी घटनादुरुस्तीला अंतिम मंजुरी दिली .

या निर्णयामुळे होलोकॉस्टसह काही अन्य आंतरराष्ट्रीय गुन्हे नाकारणे , त्यांचे समर्थन करणे किंवा त्यांचे गांभीर्य कमी लेखणे यावर कायदेशीर मार्ग आता अधिक स्पष्ट झाला आहे . हा बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहे .या निर्णयामुळे युरोपात चर्चेला उधाण आले आहे .

होलोकॉस्ट म्हणजे काय ?

होलोकॉस्ट ही दुसऱ्या महायुद्धातील सर्वात भीषण मानवी शोकांतिका मनाली जाते . १९३३ ते १९४५ या काळात जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि त्याच्या नाझी राजवटीने ज्यू समुदायाला लक्ष केले . छळछावण्या , गॅस चेंबर्स आणि सामूहिक हत्यांच्या माध्यमातून सुमारे ६० लाख ज्यू नागरिकांची हत्त्या करण्यात आली .

या मोठ्या नरसंहारात महिला , लहान मुले , वृद्ध आणि सामान्य नागरिकांचाही समावेश होता . या ऐतिहासिक सत्याला नाकारणे किंवा त्याचे समर्थन करणे म्हणजे पीडितांच्या वेदना आणि इतिहासातील वास्तव नाकारणे , अशी भूमिका या कायद्यामागे आहे .

Dana White: UFC प्रमुख डॅना व्हाईट यांनी ट्रम्पची ‘ही’ मोठी ऑफर नाकारली; व्हाईट हाऊस महत्वाचे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त

नरसंहार नाकारण्यावरही होणार कारवाई

स्वीडनच्या संसदेने मंजूर केलेल्या घटनादुरुस्तीमुळे द्वेषपूर्ण जर कोणी वक्तव्य केली तर त्यावरील सध्या असलेल्या तरतुदीची व्याप्ती म्हणजे त्याचा परीघ अजून वाढणार आहे . होलोकॉस्ट नाकारणे , न्यायालयाने सिद्ध केलेल्या काही नरसंहारांना किंवा मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याला नाकारणे आणि अशा गुन्ह्यांना जाणीवपूर्वक पाठिंबा देणे , त्याचा प्रचार व प्रसार करणे किंवा त्यांना कमी लेखणे यांचा कायद्यामध्ये स्पष्ट समावेश करण्यात आला आहे .

मात्र सगळ्याच ऐतेहासिक चर्चा किंवा मतप्रदर्शन आपोआप गुन्हा ठरणार नाही . संबंधित वक्तव्याने सुरक्षित समुदायाविरोधात द्वेष , धमकी किंवा हिंसेला पाठिंबा दिला किंवा प्रोत्साहन देण्याच्या कायदेशीर अटी पूर्ण करणे आवश्यक आहे . त्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र आणि द्वेषपूर्ण प्रचार यांच्यातील मर्यादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .

Pakistan News : मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यादौऱ्यापूर्वी शिक्षण व्यवस्था ठप्प; मरियम नवाज यांच्यामुळे परीक्षा रद्द

१ जानेवारी २०२७ पासून अंमलबजावणी

या नवीन घटनादुरुस्तीचा विशेष परिणाम प्रसारमाध्यमे , ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर होण्याची शक्यता आहे . कारण काही प्रकाशनांना स्वीडनमध्ये प्रेस आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या घटनात्मक संरक्षणाचा लाभ मिळतो . अशा माध्यमातून नरसंहार करणारा किंवा विशिष्ट समुदायांविरोधात द्वेष पसरवणारा मजकूर प्रसिद्ध झाल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी कायदेशीर आधार अधिक स्पष्ट होणार आहे .

विशेष म्हणजे स्वीडनमध्ये घटनादुरुस्ती मंजूर करण्यासाठी कायदेशीर आधार अधिक स्पष्ट होणार आहे . स्वीडनमध्ये घटनादुरुस्ती मंजूर करण्यासाठी संसदेचे दोन स्वतंत्र निर्णय आणि त्यादरम्यान सार्वत्रिक निवडणूक आवश्यक असते . मे २०२४ मध्ये पहिली मंजुरी मिळाली होती , तर नोव्हेंबर २०२६ मध्ये दुसरी आणि अंतिम मंजुरी देण्यात आली आहे . आता हा घटनात्मक बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहे .

Web Title: Sweden news holocaust denial criminal offence 2027 constitutional amendment cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Israel
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Dana White: UFC प्रमुख डॅना व्हाईट यांनी  ट्रम्पची ‘ही’ मोठी ऑफर नाकारली; व्हाईट हाऊस महत्वाचे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त
1

Dana White: UFC प्रमुख डॅना व्हाईट यांनी ट्रम्पची ‘ही’ मोठी ऑफर नाकारली; व्हाईट हाऊस महत्वाचे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त

US Midterms : अमेरिकन संसदेतील समीकरणांमुळे पुतिन यांच्यावर दबाव वाढणार? ट्रम्प यांची भूमिका आणि युक्रेन युद्धाचे नवे वळण
2

US Midterms : अमेरिकन संसदेतील समीकरणांमुळे पुतिन यांच्यावर दबाव वाढणार? ट्रम्प यांची भूमिका आणि युक्रेन युद्धाचे नवे वळण

Fake Loan Fraud: तुमच्या नावावर गुपचूप कुणी घेतलंय कर्ज? आधार-पॅनचा गैरवापर २ मिनिटांत असा पकडा
3

Fake Loan Fraud: तुमच्या नावावर गुपचूप कुणी घेतलंय कर्ज? आधार-पॅनचा गैरवापर २ मिनिटांत असा पकडा

Pakistan News : मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यादौऱ्यापूर्वी शिक्षण व्यवस्था ठप्प; मरियम नवाज यांच्यामुळे परीक्षा रद्द
4

Pakistan News : मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यादौऱ्यापूर्वी शिक्षण व्यवस्था ठप्प; मरियम नवाज यांच्यामुळे परीक्षा रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.