No Gender Ideology only Male and Female what Trump Presidential order means for transgender's and women's
वॉशिग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातात घेताच अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या संसंदेत जोरदार आगमन केले आहे. त्यांच्या निर्णयाने जागतिक स्तरावर अनेकांना आश्चर्याच पाडले आहे. अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यास्वातून बाहेर काढण्यापासून ते टिकटॉर संबंधित असे निर्णय जागतिक स्तरावर चर्चेचे विषय ठरले आहेत. दरम्यान त्यांनी अमेरिकेतील लिंग विविधता संपवणाऱ्या निर्णयावर देखील स्वाक्षरी करण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेत आता फक्त दोन लिंगांना मान्यता
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच लिंग विविधता संपवण्याचा मोठी निर्णय घेतला असून त्यांनी जाहीर केले की, अमेरिकन संघीय सरकार आता फक्त दोन लिंगांना – पुरुष आणि महिला याला अधिकृत मान्यता देईल. त्यांच्या या निर्णयाने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. खरं तरं गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत ट्रान्सजेंडर हक्कावर अनेक मोठे राजकीय वादविवाद झाले. 2024च्या निवडणुकी प्रचारादरम्यान रिपब्लिकन नेत्यांनी ट्रान्सजेंडर कायद्यांना रद्द करण्याची मागणी केली होती.
विशेषत: क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रान्सजेंडर महिलांना सहभागी होण्यापासून रोखण्यापासून भर या मागणीत देण्यात आला होता. ट्रम्प यांनी शपथ घेण्याच्या एक दिवस आधी जाहीर केले होते की, ते पुरुषांना महिलांच्या क्रीडाप्रकांरांपासून दूर ठेवण्यासाठी पावले उचलतील. याशिवाय, त्यांनी जेंडर-अफर्मिंग केअरवरही निर्बंध लावण्याचे आश्वासन दिले. ट्रम्प यांनी सांगितले की, “आजपासून, अमेरिकन सरकारची अधिकृत भूमिका अशी असेल की केवळ दोन लिंग अस्तित्वात आहेत – पुरुष आणि महिला.”
इतर काही कडक निर्णय
ट्रम्प प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डायव्हर्सिटी, इक्विटी, आणि इन्क्लूजन (DEI) कार्यक्रमांवर आणखी कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, जेंडर आयडियोलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी संघीय निधीचा वापर करण्यात येणार नाही. ट्रम्प यांच्या या निर्णयाची पुष्टी त्यांच्या पूर्वीच्या धोरणांशी मिळती-जुळती आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी ट्रान्सजेंडर सैनिकांच्या लष्करात भरतीवर बंदी घालण्याच आली होती. जो बायडेन यांनी 2021 मध्ये सत्तेत आल्यानंतर हा निर्णय मागे घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा सरकारी ओळखपत्रांवर, पासपोर्ट, लिंग निवड जैविक आधारावर करण्यात येणार आहे.
तसेच ट्रम्प यांनी अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वातून बाहेर पडण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने संघटनेच्या फंडिंगवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर यावर चिंता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी टिकटॉकसंबंधीही मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील 17 कोटी लोक वापरणाऱ्या या प्लॅटफॉर्मच्या बंदीची अंमलबजावणी 75 दिवस पुढे ढकलण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयांमुळे अमेरिकेच्या जागतिक धोरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.