Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kim Jong Un : किम जोंग उन यांचा ‘मिसाईल’ धमाका! दक्षिण कोरियाला म्हटले ‘भुंकणारा कुत्रा’; आशियातही महायुद्धाची ठिणगी?

North Korea Fires Ballistic Missiles : उत्तर कोरियाने समुद्राच्या दिशेने अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याने, दक्षिण कोरियासोबतचे संबंध सुधारण्याच्या आशांवर पाणी फेरले आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तर.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 08, 2026 | 07:52 PM
north korea fires ballistic missiles slams south korea peace proposal 2026

north korea fires ballistic missiles slams south korea peace proposal 2026

Follow Us
Follow Us:
  • हुकूमशहाची आगपाखड
  • मैत्रीला ‘मूर्खपणा’ संबोधले
  • चीन-रशियाशी वाढती जवळीक

North Korea ballistic missile launch April 2026 : जगाचे लक्ष सध्या इराण-अमेरिका संघर्षावर असतानाच, तिकडे पूर्व आशियामध्ये किम जोंग उन यांनी ‘विनाशकारी’ खेळाला सुरुवात केली आहे. उत्तर कोरियाने (North Korea) बुधवारी सकाळी आपल्या वॉनसान या पूर्व किनारपट्टी भागातून समुद्रात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण कोरियासोबतचे संबंध सुधारण्याच्या सर्व आशांना उत्तर कोरियाने केराची टोपली दाखवली असून, आता पुन्हा एकदा अणुयुद्धाच्या धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे.

मैत्रीचा प्रस्ताव फेटाळला; सळसळते शब्द आणि क्षेपणास्त्रे!

काही तासांपूर्वी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी शांततेचा हात पुढे केला होता. मात्र, उत्तर कोरियाने या प्रस्तावाचे उत्तर फुलांनी नाही तर आगीने दिले. उत्तर कोरियाचे प्रथम उपमंत्री जांग कुम चोल यांनी दक्षिण कोरियाच्या या प्रयत्नांची क्रूर थट्टा केली. त्यांनी सेऊलला “सर्वात मोठा कट्टर शत्रू” घोषित केले आणि शांततेच्या आशांना “जगाला धक्का देणारा मूर्खपणा” म्हटले. इतकेच नाही, तर मानवाधिकार प्रश्नावर दक्षिण कोरियाने घेतलेल्या भूमिकेवरून त्यांना ‘शेजाऱ्यांच्या तालावर भुंकणारा कुत्रा’ असे संबोधून अत्यंत खालच्या स्तरावरील भाषेचा वापर केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Iran Trade: चीनचा पत्ता कट! इराणचे तेल 7 वर्षांनंतर येणार भारतात; असे काय घडले की ‘Jaya Tanker’ने दोन वेळा बदलली दिशा?

चाचण्यांचा धडाका: २४० ते ७०० किमीचा थरार!

दक्षिण कोरियाच्या लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी डागण्यात आलेल्या सुरुवातीच्या क्षेपणास्त्रांनी २४० किमी अंतर कापले. मात्र, त्यानंतर डागलेल्या एका शक्तिशाली क्षेपणास्त्राने ७०० किमीपेक्षा जास्त अंतर कापत जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या (EEZ) सीमेला स्पर्श केला. विशेष म्हणजे, मंगळवारी उत्तर कोरियाने प्योंगयांगजवळ एक गुप्त चाचणी केली होती, जी रडारवरून गायब झाल्याने अयशस्वी मानली जात होती. मात्र, बुधवारी किम जोंग उन यांनी आपली लष्करी शक्ती सिद्ध करत दक्षिण कोरियाच्या सीमा सुरक्षा यंत्रणेला उघड आव्हान दिले आहे.

🇰🇵 Just as the U.S agreed a ceasefire with Iran, Kim Jong-Un hit launch on his latest batch of missile tests just to remind everyone he’s still here. They traveled roughly 240 km from North Korea towards Japan before splashing into the East Sea, marking the country’s fifth… https://t.co/3TCXDtaXdN pic.twitter.com/OjGd6sH2FU — Mario Nawfal (@MarioNawfal) April 8, 2026

credit – social media and Twitter

चीन आणि रशियाची साथ; अमेरिकेला थेट आव्हान

२०१९ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची शिखर परिषद फिस्कटल्यापासून किम जोंग उन यांनी आपला मार्ग बदलला आहे. आता ते अमेरिकेच्या संवादाची वाट न पाहता रशिया आणि चीनच्या गोटात सामील झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे दोन दिवसांच्या उत्तर कोरिया दौऱ्यावर दाखल झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरिया आता अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे जे अमेरिकेची ‘मिसाईल डिफेन्स सिस्टिम’ सहज भेदू शकेल. प्रगत घन-इंधन (Solid-Fuel) इंजिनची चाचणी याचेच प्रतीक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kalpakkam PFBR : भारताचे अणु-तांडव पाहून पाकिस्तानचा थरकाप!’दरवर्षी 300 बॉम्ब अन् 8000 किमी पल्ला’, झहीर काझमींचा ‘असा’ भयावह दावा

भारतासह जगावर काय होणार परिणाम?

जरी अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने सध्या कोणताही ‘तात्काळ धोका’ नसल्याचे म्हटले असले, तरी या भागात तणाव वाढल्यास जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होऊ शकतो. दक्षिण कोरिया आणि जपान हे जागतिक तंत्रज्ञानाचे हब आहेत. जर उत्तर कोरियाने युद्धाचा मार्ग स्वीकारला, तर जागतिक ‘सप्लाय चेन’ विस्कळीत होऊन महागाईचा भडका उडू शकतो. दक्षिण कोरियातील शांतता आता केवळ कागदावर उरली असून, किम जोंग उन यांच्या हताश लष्करी चाचण्यांनी जगाची झोप उडवली आहे.

Web Title: North korea fires ballistic missiles slams south korea peace proposal 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • North Korea
  • South korea
  • World War 3

संबंधित बातम्या

बापरे! 34,000 कामगार असणारा ‘हा’ आहे जगातील सर्वात मोठा कार बनवण्याचा कारखाना!
1

बापरे! 34,000 कामगार असणारा ‘हा’ आहे जगातील सर्वात मोठा कार बनवण्याचा कारखाना!

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी
2

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral
3

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.