Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानमध्ये 4 दिवसांत महाविध्वंस, न्यूयॉर्क टाइम्सनेही मान्य केली भारताची ताकद; पाहा Satellite Images

India Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर संपूर्ण जगाचे लक्ष उपमहाद्वीपातील परिस्थितीकडे वळले आहे. भारताने पाकिस्तानमधील अनेक लष्करी ठिकाणांवर अचूक हल्ले केल्याच्या Satellite Images समोर आल्या आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 15, 2025 | 09:31 AM
NYT India’s power evident in 4-day Pakistan strike See Satellite images

NYT India’s power evident in 4-day Pakistan strike See Satellite images

Follow Us
Close
Follow Us:

India Pakistan Ceasefire : अलीकडील भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर संपूर्ण जगाचे लक्ष उपमहाद्वीपातील परिस्थितीकडे वळले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिष्ठित अमेरिकी वृत्तपत्र न्यू यॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, भारताने पाकिस्तानमधील अनेक लष्करी ठिकाणांवर अचूक आणि परिणामकारक हल्ले केल्याचे उपग्रह प्रतिमांच्या आधारे स्पष्ट केले आहे.

हा संघर्ष फक्त शस्त्र आणि रणभूमीपुरताच मर्यादित नसून, उच्च-तंत्रज्ञानाच्या युगातील एक निर्णायक टप्पा ठरला आहे. भारताने केवळ ड्रोन आणि अचूक क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानमधील अत्यंत संवेदनशील लष्करी हवाई तळ आणि रडार प्रणालींना निष्क्रिय करण्याची क्षमता दाखवली आहे.

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची परिणामकारकता

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने ७ मे रोजी “ऑपरेशन सिंदूर” सुरू केले. यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी तळ आणि लष्करी ठिकाणांवर अचूकतेने हल्ले करण्यात आले. न्यू यॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, या चार दिवसांच्या संघर्षात भारताने कराचीपासून १०० मैलांपेक्षा कमी अंतरावर असलेल्या भोलारी हवाई तळावर अचूक हल्ला केला, ज्यामुळे विमानांच्या हँगरचे मोठे नुकसान झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचा Kirana Hills वरील अणु केंद्रावर हल्ला? अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया, तपासणीसाठी पथक रवाना

नूर खान आणि सरगोधा हवाई तळांवर गंभीर हल्ले

भारताने इस्लामाबादजवळील नूर खान हवाई तळावरही अचूक हल्ला केला, जेथे पाकिस्तानची अण्वस्त्र सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. या हवाई तळाचे स्थान पाक लष्कराच्या मुख्यालयाजवळ तसेच पंतप्रधान कार्यालयाजवळ असल्यामुळे अत्यंत संवेदनशील मानले जाते. याशिवाय, पंजाब प्रांतातील सरगोधा हवाई तळावरही भारताने धावपट्टीच्या दोन भागांवर अचूक शस्त्रांनी हल्ला केला, असेही अहवालात नमूद केले आहे.

उपग्रह प्रतिमांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या दाव्यांनुसार, भारताचा उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात आला आहे, परंतु १२ मे रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये अशा कोणत्याही प्रकारचे नुकसान आढळून आले नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, पाकिस्तानच्या रहीम यार खान विमानतळासाठी १० मे रोजी जारी करण्यात आलेल्या NOTAM (Notice to Airmen) मध्ये धावपट्टी बंद असल्याचे नमूद केले गेले, जे या ठिकाणी झालेल्या संभाव्य हल्ल्याची पुष्टी करते.

Headline misleading

NYT “Satellite images of sites 🇵🇰claimed to have hit are limited & so far do not clearly show damage caused by 🇵🇰strikes ……High-resolution satellite imagery, from before & after the strikes, shows clear damage to Pakistan’s facilities by Indian attacks.” pic.twitter.com/i3k63ZxP3P

— KRRam (@krr62023) May 14, 2025

credit : social media

भारताची युद्धनैतिक स्पष्टता आणि आघाडी

न्यू यॉर्क टाइम्सने आपल्या विश्लेषणात म्हटले आहे की, या संघर्षात भारताने पाकिस्तानवर स्पष्ट आघाडी मिळवली आहे. भारताचे हल्ले अधिक अचूक, रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि उपग्रह प्रतिमांद्वारे पुष्टीस पात्र ठरले आहेत. भारतीय लष्कराने अत्यंत उच्च दर्जाची अचूक शस्त्रास्त्रे वापरून, पाकिस्तानमधील फौजदारी पायाभूत सुविधांवर आणि रडार प्रणालींवर हल्ले केले. विशेषतः सियालकोट आणि पसरूर येथील रडार यंत्रणांवरच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण क्षमतेला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पुन्हा दहशतवादी छावण्या उभारणार…’ शाहबाज शरीफ यांनी खुली केली देशाची तिजोरी

भारताची सामरिक ताकद आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित

या संघर्षानंतर भारताने फक्त दहशतवादाविरोधात कठोर पवित्रा घेतला नाही, तर जागतिक स्तरावर आपली रणनीतिक ताकदही अधोरेखित केली आहे. न्यू यॉर्क टाइम्ससारख्या आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थेने भारताच्या कारवाईची दखल घेऊन पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचा भंडाफोड केला आहे, हे भारतासाठी कूटनैतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते. या संघर्षाने हे सिद्ध केले आहे की, भारत आता केवळ बचावात्मक नाही, तर प्रसंगी निर्णायक आणि आक्रमक पावले उचलण्यास सिद्ध आहे. आणि तेही सत्य, अचूकता आणि आंतरराष्ट्रीय समर्थनाच्या आधारावर.

Web Title: Nyt indias power evident in 4 day pakistan strike see satellite images

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • India Pakistan Ceasefire
  • india pakistan war
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
2

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर
3

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
4

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.