पाकिस्तानचा खरा चेहरा उघड: दहशतवादी छावण्यांचे पुनर्वसन, मसूद अझहरच्या कुटुंबाला १४ कोटींची भरपाई ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Operation Sindoor : दहशतवादाविरोधात लढण्याचे नाटक करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने नष्ट केलेल्या दहशतवादी तळांचे पुनर्वसन करण्याची घोषणा पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने केली असून, या हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना कोट्यवधी रुपयांची भरपाई देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर यांच्या कुटुंबातील १४ दहशतवादी या कारवाईत ठार झाले होते. या मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबांना १४ कोटी पाकिस्तानी रुपये दिले जाणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर जखमी दहशतवाद्यांना १० ते २० लाख रुपये, तसेच त्यांच्या अड्ड्यांची पुनर्बांधणीही सरकारतर्फे केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
६ आणि ७ मेच्या मध्यरात्री भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या संघटनांच्या छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या ठिकाणी भारताविरोधात दहशतवादी कारवायांची आखणी सुरू होती. या हल्ल्यांमध्ये पाक लष्कराच्या ११ जवानांचा मृत्यू आणि ७८ जण जखमी झाले. भारतीय लष्कराच्या नेमक्या आणि धडाडीच्या कारवाईमुळे पाकिस्तानची संरक्षण व्यवस्था कोलमडली, आणि त्यांनी भारताविरुद्ध पुन्हा हल्ल्याचा निष्फळ प्रयत्न केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतीय वंशाच्या अनिता आनंद बनल्या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन रचला इतिहास
या संपूर्ण घटनाक्रमावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक धक्कादायक घोषणा केली. दहशतवाद्यांना शहीद मानून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, घरांची उभारणी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि उपचाराचा खर्च सरकार उचलेल असे त्यांनी जाहीर केले. या घोषणेनुसार, मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपये, जखमींना १० ते २० लाख रुपये, तसेच छावण्यांची पुनर्बांधणी करण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
याशिवाय, शाहबाज शरीफ सरकारने मारल्या गेलेल्या पाकिस्तानी जवानांच्या कुटुंबियांना १ ते १.८ कोटी रुपये, निवृत्तीच्या तारखेपर्यंत पूर्ण वेतन आणि भत्ते, मुलीच्या लग्नासाठी १० लाख रुपये, आणि घरासाठी १.९ ते ४.२ कोटी रुपये देण्याची घोषणाही केली आहे. जखमी जवानांनाही त्यांच्या दर्जानुसार २० ते ५० लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्यात येणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धबंदीचे श्रेय घेण्यात अमेरिका पुढे पण पाकिस्तानच्या ‘दहशतवादी संबंधांवर’ मात्र का बोलती बंद?
पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना ‘शहीद’ घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा वर्षाव करणे, आणि त्यांची अड्डे पुन्हा उभारणे, हे आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. भारतासह अनेक देशांनी पाकिस्तानचा हा दुटप्पी आणि धोकादायक पवित्रा उघडकीस आणला आहे. शांतता आणि दहशतवादविरोधी लढ्याचे ढोंग करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो अजूनही दहशतवाद्यांचा पंखा धरून आहे.
शाहबाज शरीफ सरकारने ज्या पद्धतीने दहशतवाद्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला आहे, त्यातून हे स्पष्ट होते की पाकिस्तान अजूनही दहशतवादाचा पृष्ठसंरक्षक देश म्हणूनच कार्यरत आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांची पुनर्बांधणी, भरपाई, आणि त्यांच्यावर उधळलेली अब्जावधींची तिजोरी – हे सर्व करताना पाकिस्तानने जगासमोर आपली खोटी ‘शांतीप्रिय’ प्रतिमा पार उद्ध्वस्त करून टाकली आहे.