Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांना सुनावली 34 वर्षांची शिक्षा; ‘या’ प्रकरणात जाणार तुरुंगात

पाकिल्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने गिलगित-बाल्टिस्तान प्रांताच्या माजी मुख्यमंत्री खालिद खुर्शीद खान यांना 34 वर्षांच्या तुरुंगवासाची व 6 लाख पाकिस्तानी रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 01, 2025 | 05:01 PM
पाकिस्तान न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांना सुनावली 34 वर्षांची शिक्षा; 'या' प्रकरणात जाणार तुरुंगात

पाकिस्तान न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांना सुनावली 34 वर्षांची शिक्षा; 'या' प्रकरणात जाणार तुरुंगात

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पाकिल्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने मंगळवारी गिलगित-बाल्टिस्तान प्रांताच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी मुख्यमंत्री खालिद खुर्शीद खान यांना 34 वर्षांच्या तुरुंगवासाची व 6 लाख पाकिस्तानी रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खालिद यांच्यावर सुरक्षा यंत्रणांना धमकावण्याचा तसेच हिंसाचार भडकावण्याचा आरोप होता. 31 डिसेंबर 2024 रोजी या प्रकरणाचा निकाल लागला.

हिंसा भडकवण्याचा प्रयत्न

जुलै 2024 मध्ये गिलगितमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनानंतर खालिद खुर्शीद यांच्या विरोधात राजद्रोह व दहशतवादाशी संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले होते. या वेळी त्यांनी एका भाषणाद्वारे गिलगित-बाल्टिस्तानच्या मुख्य सचिव, पोलीस अधिकारी आणि गुप्तचर संस्थांना धमक्या दिल्याचे आरोप आहेत. त्यांनी सत्तेवर परत आल्यास कोणालाही सोडणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. न्यायालयाने सांगितले की, खालिद खुर्शीद यांनी संवेदनशील संस्थांविरुद्ध हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाचा प्रभाव संपताच युक्रेनचा सीरियात हस्तक्षेप; परराष्ट्र मंत्रींनी घेतली जुलानी यांची भेट

फरार असलेल्या खालिद खुर्शीद यांची चौकशी

गुन्हा दाखल झाल्यानंतर संयुक्त तपास पथक (JIT) स्थापन करण्यात आले. या पथकाच्या चौकशीत खालिद खुर्शीद दोषी आढळले. साक्षीदारांनी दिलेल्या पुराव्यांवरून न्यायालयाने खालिद खुर्शीद यांना विविध कलमांतर्गत दोषी ठरवत 34 वर्षांची कारावासाची व 6 लाख दंडाची शिक्षा सुनावली आहे.

6 लाख रुपयांचा दंड व कायदेशीर कारवाई

मीडिया रिपोर्टनुसार, कोर्टाने खालिद खुर्शीद यांना 6 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर पोलिसांना त्यांना अटक करून शिक्षा अंमलात आणण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, नेशनल डेटाबेस अँड रजिस्ट्रेशन अथॉरिटी (एनएडीआरए) यांना खालिद खुर्शीद यांचे राष्ट्रीय ओळखपत्र (CNIC) ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे त्यांच्या कायदेशीर स्थितीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

खालिद खुर्शीद खान यांचा राजकीय प्रवास

खालिद खुर्शीद खान हे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे नेते आहेत. इम्रान खान यांच्या कार्यकाळात ते गिलगित-बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. 2020 ते जुलै 2023 या कालावधीत खुर्शीद यांनी मुख्यमंत्री पद भूषवले. मात्र, फर्जी डिग्री प्रकरणात त्यांना अयोग्य ठरवण्यात आले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले. सध्या फरार असलेल्या खालिद खुर्शीद यांच्या अटकेसाठी आणि शिक्षेसाठी पाकिस्तानी प्रशासन कठोर पावले उचलत आहे. त्यांच्या या शिक्षेमुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘या’ देशात फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली रद्द; जाणून घ्या ऐतिहासिक निर्णयामागचे कारण

Web Title: Pakistan court sentenced ex gilgit balistan cm to 34 years in jail nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • pakistan

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
4

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.