फोटो सौजन्य: iStock
अलीकडे जगभरात गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याबाबत वादविवाद होत आहेत. काही देश मृत्युदंड कायम ठेवण्याचे समर्थन करतात, तर काही देशांनी हा कठोर कायदा पूर्णतः रद्द केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी फाशीच्या शिक्षेचे जोरदार समर्थन केले आहे, तर दुसरीकडे काही देश ही शिक्षा रद्द करत आहे. आता या यादीत आणखी एका देशाचे नाव सामील झाले आहे. आता आफ्रिकन देश जिम्बाब्वेने मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद समाप्त केली आहे. यापुढे जिम्बाब्वेमध्ये कोणत्याही व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार नाही.
राष्ट्रपतींनी दिली मंजुरी
जिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष एमर्सन मनांगाग्वा यांनी मृत्युदंडाच्या शिक्षेच्या रद्दीकरणाच्या विधेयकाला मंजुरी दिली असल्याची माहिती आहे. 2005 सालानंतर जिम्बाब्वेमध्ये कोणालाही फाशी देण्यात आलेली नव्हती. जवळजवळ दोन दशकांपासून मृत्युदंडाची अंमलबजावणी थांबलेली असल्यामुळे अशा प्रकारचा निर्णय अपेक्षित होता. या निर्णयामुळे देशातील सुमारे 60 कैद्यांची सजा रद्द होईल, ज्यांना यापूर्वी मृत्युदंड सुनावला गेला होता. यामागचे आणखी एक कारण म्हणजे येथे सरकारी जल्लाद म्हणून कार्य करायला कोणी तयार नव्हते यामुळे देखील हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
मृत्युदंड संपुष्टात का आणला?
जिम्बाब्वेमध्ये मृत्युदंड रद्द करण्यामागे अनेक कारणे आहेत. मृत्युदंडाची शिक्षा मानवाधिकारांचे उल्लंघन मानली जाते. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी या शिक्षेविरोधात आवाज उठवला आहे. शिवाय, जिम्बाब्वेमध्ये फाशीची शिक्षा अंमलात आणण्यासाठी जल्लादांची कमतरता देखील जाणवली होती. या सर्व कारणांमुळे मृत्युदंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
113 देशांनी केली फाशीची शिक्षा रद्द
मानवाधिकार गटाने दिलेल्या माहितीनुसार, केनिया, लायबेरिया आणि घाना सारख्या इतर आफ्रिकन देशांनी अलीकडेच फाशीची शिक्षा रद्द करुन सकारत्क पाऊल उचलेले आहे. मात्र, अद्याप याचे कायद्यात रुपांतर झालेले नाही. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या म्हणण्यानुसार, जगभरात जवळपास, तीन चतुर्थांश देशांमध्ये फाशीची शिक्षा नाही. तर 113 देशांनी फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द केली असल्याचे या गटाने म्हटले आहे. यामध्ये 24 आफ्रिकन देश आहेत.
चीन जगातील सर्वात मोठा फाशी देणारा देश
ॲम्नेस्टी इंटरनॅशनलनुसार, सर्वात जास्त फाशीची शिक्षा ठोठावणाऱ्या देशांची संख्या 2023 मध्ये 1153 होती. गेल्या वर्षी ही संख्या कमी होऊन 883 झाली. तसेच उत्तर कोरिया, व्हिएतनाम आणि चीन हे देश सर्वात जास्त फाशी देणारे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल म्हटले आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, 2023 मध्ये इराण आणि सौदी अरेबियामध्ये जवळपास 90 टक्के लोकांना फाशीची शिक्षा झाली होती. यामध्ये अमेरिका आणि सोमालिया हे देश देखील येतात.