पाकिस्तान आपल्या अस्तित्वातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे.पाकिस्तानची आर्थिक स्थिती (Pakistan Economic Crisis) अत्यंत बिकट असून आता परिस्थिती अशी झाली आहे की, पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.बेलआउट पॅकेजबाबत IMF सोबतची चर्चाही अयशस्वी ठरली आहे, त्यामुळे पाकिस्तानला तातडीने दिलासा मिळताना दिसत नाही. महागाईने कंबरडे असताना आता परिस्थिती अशी आहे की सध्या लोकं खाण्यापिण्याची चिंता करत आहेत, तर, शिक्षण आणि इतर गोष्टी मागे पडत आहे.
[read_also content=”बीबीसीनं पुन्हा ओढवून घेतला वाद! पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता ‘जिहादी दुल्हन’वर डॉक्युमेंट्री, ब्रिटनमध्ये विरोध सुरू https://www.navarashtra.com/world/after-prime-minister-narendra-modi-now-bbc-documentary-on-jihadi-dulhan-in-controversy-nrps-368918.html”]
मध्यमवर्गीयांमध्ये रोष
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील एका स्थानिक सीफूड व्यापाऱ्याने सांगितले की, महागाईमुळे त्यांची विक्री निम्मी झाली आहे.विशेषत: मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला परवडत नसल्याने केवळ श्रीमंत वर्गच वाढत्या महागाईचा सामना करू शकतो.त्याचप्रमाणे, एका पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाने सांगितले की त्यांच्या पेट्रोल पंपावरील तेलाच्या विक्रीतही लक्षणीय घट झाली आहे.पूर्वी जिथे पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी रांग असायची तिथे आज पेट्रोल पंप जवळपास रिकामेच आहेत.याचे कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 262 रुपये आहे.अल्प उत्पन्न गटातील लोकांना पाकिस्तानात घरखर्च चालवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागते.लोक म्हणतात की जीवन जगणे खूप कठीण झाले आहे, परंतु अशा परिस्थितीत ते काहीही करू शकत नाहीत.पाकिस्तानातील शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट आहे.वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे.वीज आणि मजुरीचा खर्च वाढल्याने शेती हा आता फायदेशीर व्यवहार राहिलेला नाही.यासोबतच विजेचा तुटवडाही पाकिस्तानी जनतेसाठी अडचणीचा ठरला आहे.पाकिस्तानचे शेतकरी मोहम्मद रशीद म्हणतात की ‘आमच्याकडे पुरेसे अन्न नाही, मग वीज, शिक्षण आणि कपड्यांची व्यवस्था कुठून करावी’.
पाकिस्तानने आयएमएफकडे पुन्हा पसरले हात
कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेला पाकिस्तान आता पूर्णपणे कंगाल झालेल्या स्थितीत (Pakistan Economic Crisis) पोहचलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंची आयात करण्याइतपतही पाकिस्तानकडे परदेशी मुद्रा भंडार (Foreign Currency ) राहिलेले नाही. देशात महागाईनं (Inflation) कहर केला असून, लोकं दोन वेळच्या अन्नासाठी शोधाशोध करीत असल्याचं दिसतंय. अशा अत्यंत बिकट स्थितीत पाकिस्तान सरकारनं परकीय बाजारातून खरेदी करण्यासाठी पाकिस्तानकडेही फारच कमी परकीय चलन साठा शिल्लक आहे. अलीकडेच पाकिस्तानने विदेशी कर्जाचा हप्ता परत केला आहे. यामुळे, देशाचा चलन साठा $3.09 अब्ज इतका कमी झाला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा आयएमएफकडे कर्ज मागितले आहे, मात्र आयएमएफच्या अटींमुळे तिथल्या सरकारसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. नेमक्या काय आहेत या अटी ज्यामुळे शहबाज शरीफ यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.
Web Title: Pakistan facing economic crisis badly nrps