इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan) एका मेडिकल कॉलेजने (Medical College) व्हॅलेटांईन डे (Valentine Day) च्या दिवसासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना ड्रेसकोडच (Dresscode) निश्चित करुन दिला आहे. यासाठी कॉलेजने निर्देश जारी केले आहेत. त्यात मुलींनी व्हॅलेंटाईनच्या दिवशी हिजाब (Hijab) घालूनच कॉलेजमध्ये यावे, असे फर्मान काढले आहे. तर विद्यार्थ्यांनी या दिवशी मुलींपासून २ मीटर अंतर बाळगावे, आणि नजामासाठी वापरण्यात येणारी पांढरी टोपी घालून येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, इस्लामाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजने (Islamabad International Medical College) हे निर्देश जारी केले आहेत. व्हॅलेंटाईन डेशी संबंधित कोणत्याही बाबीत समावेश घेऊ नये, असेही बजावण्यात आले आहे. या दिवसामुळे मुले-मुली चुकीच्या मार्गाला लागतील, अशी त्यामागची भावना आहे.
[read_also content=”Valentine’s Day ला पतीने फक्त आणि फक्त तुम्हालाच पहात रहावं म्हणून घरी करा या ४’ ब्युटी ट्रिटमेंट https://www.navarashtra.com/lifestyle/4-beauty-care-tips-for-valentines-day-special-to-look-most-beautiful-in-front-of-your-husband-nrvb-237500.html”]
सर्व विद्यार्थिनींनी हिजाब घालून यावे, त्यात चेहरा, मान आणि छाती पूर्ण झाकली जाईल, याची खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले आहे, तर मुलांनी नमाजासाठीची पांढरी टोपी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे निर्देश न पाळणाऱ्या मुला-मुलींना दंडही करण्यात येणार आहे. मुला-मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी प्राध्यापकांना जबाबदारी देण्यात आली आहे. ते वर्गांवर गस्त घालणार आहेत.
[read_also content=”हवेत प्रेम आणि सं भो ग, एअरलाइनने आणला ४५ मिनिटांचा प्लॅन, जाणून घ्या किती मोजावे लागतील पैसे https://www.navarashtra.com/lifestyle/american-airline-love-cloud-offering-people-to-have-s-e-x-on-board-says-it-keeps-couples-from-divorcing-nrvb-236909/ या राज्यात महिलांना रविवारी किस करण्यास आहे मनाई, किस करण्याशी संबंधित या ५ रंजक गोष्टींनी व्हाल आश्चर्यचकित https://www.navarashtra.com/lifestyle/kiss-day-place-where-you-cannot-kiss-women-on-sunday-know-5-fun-facts-about-kissing-read-the-full-details-in-marathi-nrvb-237179.html”]