
Pakistan panics after attempt to steal Russian S-400 technology ISI's secret network exposed in Russia
रशियाने आयएसआयचे गुप्तहेर नेटवर्क उद्ध्वस्त केले, जे रशियन S-400 क्षेपणास्त्र तंत्रज्ञान चोरण्याचा प्रयत्न करत होते.
पाकिस्तान हादरला आणि भारतीय माध्यमांवर बनावट बातमीचा आरोप करत मॉस्कोतील दूतावासातून स्पष्टीकरण दिले.
भारताशी संबंधित S-400 प्रणाली व ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ, या घटनाक्रमाला अधिक महत्त्व देतो.
Pakistan ISI S-400 plot : रशियाने पाकिस्तानच्या कुख्यात गुप्तहेर संस्था आयएसआय (ISI) चे एक मोठे गुप्त नेटवर्क उद्ध्वस्त केले आहे. हे नेटवर्क रशियन बनावटीच्या S-400 प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आणि लष्करी हेलिकॉप्टर तंत्रज्ञानाची चोरी करण्याच्या प्रयत्नात होते. या प्रकरणाच्या उघडकीनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून, मॉस्कोमधील पाकिस्तानी दूतावासाने भारतीय माध्यमांवर “बनावट कथा” पसरवण्याचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
रशियन गुप्तचर संस्थांनी अलीकडेच सेंट पीटर्सबर्गमध्ये एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. त्या व्यक्तीवर आरोप आहे की तो आयएसआयसाठी काम करत होता आणि लष्करी हेलिकॉप्टर तंत्रज्ञान, हवाई संरक्षण प्रणाली विकासाशी संबंधित दस्तऐवज आणि लष्करी वाहतूक हेलिकॉप्टरची माहिती परदेशात पाठवण्याचा प्रयत्न करत होता. रशियन गुप्तचरांनी ही कारवाई वेळेत उघडकीस आणत तंत्रज्ञान चोरीचा कट उधळून लावला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन आणि तिबेटला जोडणारा ‘Hongqi Bridge’ पडल्यानंतर बनला जगभरात चर्चेचा विषय; VIRAL VIDEO मुळे माजली खळबळ
रशियन आणि भारतीय संरक्षण भागीदारीत S-400 प्रणालीचे विशेष स्थान आहे. भारताने काही वर्षांपूर्वीच रशियाकडून ही अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये तिचा महत्त्वपूर्ण वापर झाला होता. या पार्श्वभूमीवरच, आयएसआयने S-400 क्षेपणास्त्र तंत्रज्ञान चोरण्याची योजना आखल्याचा आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, भारत आता पाच अतिरिक्त S-400 प्रणाली खरेदी करण्याची तयारी करत आहे आणि याच काळात हा हेरगिरीचा प्रकार उघड झाल्याने चर्चा अधिक तीव्र झाली आहे.
रशियन माध्यमांच्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लक्ष Mi8 AMTShV (VA) या प्रगत रशियन लष्करी हेलिकॉप्टरवर देखील होते. हे हेलिकॉप्टर आर्क्टिक आणि ध्रुवीय हवामानात ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहे. पाकिस्तानच्या गुप्त एजन्सीने या हेलिकॉप्टरच्या तांत्रिक रचनांची माहिती मिळवून ती लष्करी वापरासाठी तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याचेही वृत्त आहे.
मॉस्कोस्थित पाकिस्तानी दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की,
“ही बातमी पाकिस्तान आणि रशियन फेडरेशनमधील दीर्घकालीन, मैत्रीपूर्ण आणि सहकार्यात्मक संबंधांना हानी पोहोचवू पाहणाऱ्या टीकाकारांच्या हताशपणाचे प्रतीक आहे.”
Breaking News ⚡️ Russian Intelligence arrests Pakistani spies for trying to steal S-400 technology. Great move by FSB and SVR of Russia.S-400 is the heart of Indian Military. This clearly means Pakistan couldn’t evade S-400 and lots several jets like JF-17,F-16 vs S-400 🇷🇺🇮🇳 pic.twitter.com/EJVOXlGcS5 — GeoStrat Bharat (@GeostratB) November 10, 2025
credit : social media
दूतावासाने पुढे भारतीय माध्यमांवर आरोप करत म्हटले की, काही वृत्तसंस्थांनी इस्लामाबादमधील रशियन दूतावासाच्या निवेदनाशी या प्रकरणाला जोडण्याचा “व्यर्थ प्रयत्न” केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान-रशिया संबंध परस्पर आदर, विश्वास आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Delhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर मुस्लिम जगाचं मोठं विधान; सौदी-युएई-इराणची अनपेक्षित प्रतिक्रिया
या घटनेमुळे दक्षिण आशियातील सामरिक समीकरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण भागीदारी अनेक दशकांपासून मजबूत आहे. त्याउलट, पाकिस्तानला या दोघांमधील सहकार्यामुळे अस्वस्थता जाणवते. आता रशियाने थेट आयएसआयचा तंत्रज्ञान चोरीचा कट उघड केल्याने, पाकिस्तानचे जागतिक प्रतिमान आणखी धोक्यात आले आहे.