अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये तणाव वाढला (फोटो- सोशल मीडिया)
पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये वाढला संघर्ष
तालिबान सरकार कधीही हल्ला करण्याच्या तयारीत
इस्तंबूलमधील शांतता चर्चा अयशस्वी
गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संबंध बिघडले असल्याचे समोर येत आहे. सीमा वाद आणि दहशतवादाच्या आरोपामध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. अनेक दिवसांपासून या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये तुर्कीमध्ये शांतता चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे. ही चर्चा अपयशी ठरल्याचे समोर आले आहे.
शांतता चर्चा अपयशी ठरली आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना सवधानतेचे इशारे दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही देश एकमेकांवर कधीही हल्ला करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
तालिबान सरकारने पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. परिणाम भोगण्यासाठी तयार रहा असा इशारा दिल्याचे समजते आहे. यांच्या भूमीवर कोणत्याही प्रकारचा हल्ला सहन केला जाणार नाही असा कडक इशारा अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने पाकिस्तानला दिला आहे. अफगाणिस्तानला शांतता प्रस्थापित करायची आहे. मात्र पाकिस्तानच्या काही अधिकाऱ्यांमुळे आमचा हा हेतु साध्य होत नाहीये.
तालिबानच्या धमकीने मुनीरची टर्रकन फाटली
पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात सध्या घुसखोरी वाढली आहे. तथापि, मुनीर यांनी त्यांच्याच देशात सुरू असलेल्या कारवायांवर मौन बाळगले आहे, असा आरोप करण्यात येत आहे. काही दिवस आधी पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर हल्ला केला होता. ज्यात अनेक नागरिक ठार देखील झाले होते.
तालिबानचा पाकिस्तानला इशारा
असीम मुनीर यांच्या विधानाचा अफगानिस्तानने चांगलाच समाचार घेतला आहे. तेथील तालिबान सरकारने पाकिस्तानला इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि एक प्रमुख तालिबानी नेता सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानला खडसावले आहे. आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. जर हल्ला झाला तर आमचे उत्तर अत्यंत विनाशकारी असेल, असा इशारा तालिबान सरकारने पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. चार दिवसांच्या इस्तंबूल शांतता चर्चेत कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी अफगाण तालिबानला उघडपणे धमकी दिली आहे. आसिफ यांनी कठोर शब्दांत इशारा दिला की, जर पाकिस्तानमध्ये कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर तालिबानचा पूर्णपणे नाश केला जाईल आणि त्यांना पुन्हा गुहांमध्ये लपण्यास भाग पाडले जाईल.