Pakistan PM Shahbaz Sharif admitted to hospital due to hemorrhoids
इस्लामाबाद : जम्मू –काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यामुळे भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भारताकडून पाकिस्तानबाबत आक्रमक भूमिका घेतली जात आहे. भारताने सिंधू जल करारावर स्थगिती आणली आहे. तर पाकिस्तानने शिमला करार मोडला आहे. यामुळे भारत पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
भारत पाकिस्तान सीमा भागांमध्ये हालचालींना वेग आला आहे. भारताने 48 पर्यटनस्थळे बंद केली आहेत. त्याचप्रमाणे सीमा भागातील रहिवाशांना देखील स्थलांतरित केले आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानी नागरिकांना देखील भारत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. भारत सरकारच्या जलद निर्णयांमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने त्यांना युद्धाचे आव्हानही दिले, परंतु भारत अजूनही योग्य उत्तर देण्यासाठी रणनीतीवर काम करत आहे. दरम्यान, चिंताग्रस्त आणि अस्वस्थ झालेले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नियंत्रण रेषेवरील तणावपूर्ण वातावरण पाहून पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना घाम फुटला आहे.पाकिस्तानी नेते आणि लष्कर प्रमुख घाबरले आहेत असे दिसून येत आहे. त्यांची गुप्त कागदपत्रे लीक झाली आहेत. ज्या आजारामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याचीही खिल्ली उडवण्यात येत आहे. लीक झालेल्या कागदपत्रात त्यांच्या आजाराचाही उल्लेख आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांना नेमकं झालंय तरी काय?
पाकिस्तानी कागदपत्रांनुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना मूळव्याध आहे. यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. शाहबाज यांना रावळपिंडीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, शाहबाजची तब्येत कशी आहे हे अद्याप कळलेले नाही. पण डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या आजाराची माहिती लपवण्याचा आदेश होता.
पहलगाम हल्ल्यबाबात बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रावळपिंडीतील आर्मी हॉस्पिटलने जारी केलेल्या एका गुप्त कागदपत्रातून शाहबाज शरीफ यांच्या आजाराचा खुलासा झाला आहे. या कागदपत्रात असे म्हटले आहे की पाक पंतप्रधान मूळव्याधाने ग्रस्त आहेत. याशिवाय, या कागदपत्रात असे लिहिले आहे की पंतप्रधानांबद्दल मीडिया आणि लोकांना काहीही सांगू नये. रुग्णालयाला हे प्रकरण गुप्त ठेवण्यास सांगण्यात आले आहे. शहबाज शरीफ 27 एप्रिलपासून रुग्णालयात दाखल आहेत.
भारताच्या भूमिकेला पाकिस्तान घाबरला
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रकृती वाईट आहे आणि संपूर्ण पाकिस्तानला भारत त्यांचे काय करणार आहे याची चिंता आहे. मोदी सरकारने प्रथम सिंधू पाणी करार रद्द केला, नंतर पाकिस्तानी व्हिसा रद्द केला आणि अटारी सीमा देखील बंद केली. यासोबतच अनेक देश भारताला पाठिंबा देत आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानच्या या नापाक कृत्याची जगभरात टीका होत आहे.