भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक (फोटो- ani)
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. आज या हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झाला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध चांगलाच आक्रमक झाला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. दरम्यान आता भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केली आहे.
पाकिस्तानवर भारत अनेक प्रकरे कारवाई करत आहे. भारत सरकारने आता एक मोठे पाऊल उचले आहे. भारत सरकारने पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर बंदी घातली आहे. यासोबतच भारताने पहालगाम हल्ल्यातील आयएसपीआर आणि आयएसआयशी संबंधित अनेक पाकिस्तानी पत्रकरांच्या अकाऊंटवर बंदी घातली आहे.
याधी भारताने पाकिस्तानच्या न्यूज आणि सोशल मिडिया, युट्यूबर यांच्यावर देखील बंधने आणली आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानच्या 16 यूट्यूबचॅनेल्सवर बंदी घातली आहे. भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानी यूट्यूब छणलेस भारतीय सेनेविरुद्ध खोटा प्रचार करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
LOC वर घडामोडींना वेग
जम्मू-कश्मीर हल्ल्यापासून पाकिस्तानातही मोठी खळबळ माजली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये वेगाने घडामोडींना घडत असल्याचे दिसत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानात घुसखोरी करणार, असा विश्वास पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनीही व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे, हल्ल्याच्या काही तासांच्या आतच पाकिस्तानने भारतासाठी हवाई मार्गही बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही पाकिस्तानच्या मनातील दहशत अद्यापही कायम आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी भारतीय लष्कराकडून कधीही हल्ला होऊ शकतो, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराकडून मिळाल्याचे म्हटलं आहे.
Pahalgam Terror Attack: “…तर भारत सुरक्षित राहणार नाही”; ‘नापाक’ संरक्षणमंत्री पुन्हा बरळले
‘नापाक’ संरक्षणमंत्री पुन्हा बरळले
पहलगाममध्ये झालेला हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नसल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जायला नको हीच आमची भूमिका आहे, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे.
भारत आपल्यावर हल्ला करेल अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. दरम्यान भारताने यांच्या भूमीवर किंवा शहरांमध्ये दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. भारताला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराच ख्वाजा आसिफ यांनी दिला आहे. भारताने लष्करी युद्धाभ्यास सुरू केल्याचे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.