Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी; पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेत जाऊन घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

संयुक्त राष्ट्रच्या महासभेचे 80 वे अधिवेशन 9 सप्टेंबर रोजी सुरू झाले. ही उच्चस्तरीय बैठक 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान चालेल. या बैठकीत ब्राझील पहिला वक्ता असेल, तर त्यानंतर अमेरिका महासभेला संबोधित करेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2025 | 03:22 PM
आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी; पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेत जाऊन घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी; पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेत जाऊन घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच या वर्षाच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र महासभेची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला जगभरातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला जाणार आहेत. या दरम्यान ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली जात आहे.

पाकिस्तानी पंतप्रधान 25 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती आहे. संयुक्त राष्ट्र महासभेची ही बैठक UNGA च्या नजीक होणार आहे. या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर देखील त्यांच्यासोबत असतील. या बैठकीत पाकिस्तानातील पुरापासून कतारवर झालेल्या इस्रायली हल्ल्यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या UNGA बैठकीत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अमेरिकेला जाणार आहेत.

संयुक्त राष्ट्रच्या महासभेचे 80 वे अधिवेशन 9 सप्टेंबर रोजी सुरू झाले. ही उच्चस्तरीय बैठक 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान चालेल. या बैठकीत ब्राझील पहिला वक्ता असेल, तर त्यानंतर अमेरिका महासभेला संबोधित करेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 23 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावरून जागतिक नेत्यांना संबोधित करतील. राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्या कार्यकाळात ते पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.

परराष्ट्रमंत्री जयशंकर अधिवेशनाला करणार संबोधित

परराष्ट्र मंत्री जयशंकर 27 सप्टेंबर रोजी भारतातून अधिवेशनाला संबोधित करतील. मात्र, त्यापूर्वी जुलैमध्ये जाहीर झालेल्या वक्त्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींचे नाव समाविष्ट होते. त्या यादीनुसार, पंतप्रधान मोदी 26 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करणार होते. वक्त्यांच्या या यादीत आणखी सुधारणा होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.

Web Title: Pakistan prime minister shahbaz sharif to visit us to meet donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • Shahbaz Sharif
  • US President

संबंधित बातम्या

Adil Raja: ‘म्हणून पुतीन यांनी केला शाहबाजचा अपमान…’ माजी अधिकाऱ्याच्या जबाबामुळे घरातूनच लागले पाकड्यांच्या खोटेपणाला ग्रहण
1

Adil Raja: ‘म्हणून पुतीन यांनी केला शाहबाजचा अपमान…’ माजी अधिकाऱ्याच्या जबाबामुळे घरातूनच लागले पाकड्यांच्या खोटेपणाला ग्रहण

UNSC 1267 : Sydney Attackनंतर ‘टेररिस्तान’ विरुद्ध भारत-अमेरिका एकत्र; कठोर निर्बंधांची मागणी, पण लक्ष मात्र ‘त्याच’ संघटनेवर
2

UNSC 1267 : Sydney Attackनंतर ‘टेररिस्तान’ विरुद्ध भारत-अमेरिका एकत्र; कठोर निर्बंधांची मागणी, पण लक्ष मात्र ‘त्याच’ संघटनेवर

Bondi Beach Shooting: ISIS ध्वज, IED आणि 16 निष्पाप ठार; सिडनी हत्याकांडात जगाने पहिला दहशतवादाचा ‘असा’ क्रूर चेहरा
3

Bondi Beach Shooting: ISIS ध्वज, IED आणि 16 निष्पाप ठार; सिडनी हत्याकांडात जगाने पहिला दहशतवादाचा ‘असा’ क्रूर चेहरा

H-1B Visa News: ट्रम्प यांच्या H-1B Visa फी निर्णयाला आव्हान! न्यूयॉर्कसह 19 राज्यांनी न्यायालयात दाखल केला खटला 
4

H-1B Visa News: ट्रम्प यांच्या H-1B Visa फी निर्णयाला आव्हान! न्यूयॉर्कसह 19 राज्यांनी न्यायालयात दाखल केला खटला 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.