
Papal Election Black smoke at Vatican means no new pope after morning conclave votes
व्हॅटिकन सिटी: कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल 2025 रोजी निधन झाले. दरम्यान त्यांच्या निधनानंतर पुढील पोप कोण असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. 07 मे रोजी नवीन पोप निवडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. परंतु अद्याप नवीन पोप कोण असेल हे निश्चित झालेले नाही. सध्या व्हॅटिकन सिटीमध्ये पोपची निवड प्रक्रिया सुरु झालेली आहे.
नवीन पोपची निवड ही बंद दरवाज्याआड केली जाते. या प्रक्रियेदरम्यान पोपोची निवड झाल्यावर सिस्टरॉन चॅपलच्या चिमणीतून पांढरा धूर निघतो आणि पोपची निवड न झाल्यास काळा धूर निघतो. पोप निवडीसाठी गुप्त पद्धतीने मतदान केले जाते. परंतु मदतानाच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. मात्र एकाही फेरीत पोपची निवड झालेली नाही. यामध्ये 71 देशांतून 133 कार्डिनल्स निवडणूकीत सहभागी झाले आहेत. सध्या पोप यांच्या निवडीचा प्रक्रिया अधिक गुंतागुतींची जाली आहे. यामध्ये 133 कार्डिनल मतदान करणार आहेत.
पोप कॉन्क्लेव्ह हे पोप फ्रान्सिस यांचे सर्वात आवडते उत्तराधिकारी मानले जातात. परंतु त्यांच्या आधी काही कार्डिनल्सची नावे समोर आली आहेत.य मध्ये इटलीने पिएत्रो पॅरोलिन, फिलिपिन्सचे लुईस अँटोनियो टंगले, गंहेरीचे पीटर एर्डो या कार्डिनल्सचा समावेश आहे.
पोप यांना ख्रश्चिन समुदायाचे सर्वात मोठे धर्मगुरु म्हणून ओळखले जाते. पोप यांच्याकड धार्मिक प्रशासकीय. राजकीय आणि सांस्कृतिक जबाबदारी असते. तसेच वॅटिकन सिटीचे प्रशासक म्हणून त्यांच्याकडे कार्यकारी कायदे आणि न्यायिक अधिकार असतात. सर्व बिशप आणि कार्डिनलची नियुक्तीची जबाबदारी पोप यांच्याकडे असते. चर्चच्या स्थानिक आणि जगाभरातील कामकाजावर त्यांचा प्रभाव असतो.
पोप यांना जागतिक स्तरावर एक मोठे आणि प्रभावी नेते म्हणून मान मिळतो. पोप यांच्याकडे आर्थिक, लष्करी ताकद नसली तरी जगातील देशांच्या नेत्यांशी पोप शांतता पर्यावरण, सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करु शकतात. जागतिक देशांमध्ये मध्यस्थी आणि शांततेची भूमिका बजावण्याचा त्यांच्याकडे हक्क असतो.
पोप धर्मगुरुची निवड अत्यंत गोपनीय आणि परंपरागत पद्धतीने करण्यात येते. याला पॅपल कॉन्क्लेव असे म्हटले जाते. जगभरातील कार्डिनल म्हणजे वरिष्ठ पाद्री एकत्र येतात आणि मदतदानाद्वारे नवीन पोपची निवड करतात. सध्या व्हॅटिकनमध्ये 235 कार्डिनल आहेत. यामध्ये 80 वर्षाखाली 138 कार्डिनला असून त्यांना मतदानाच हक्क आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोण होतील नवे पोप? ‘हे’ आहेत जगातील सर्वात मोठे पाच चर्चित चेहरे