
Papal Election Who will be the next Pope The election process will begin on May 7
वॅटिकन सिटी: कॅथलिक चर्चचे सर्वात मोठे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल 2025 रोजी निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.26 एप्रिल 2025 रोजी त्यांना वॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स स्क्वेअर येथे त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूनंतर पुढील पोप कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आही. याच वेळी वॅटिकनने नवीन पोप निवडची घोषणा केली आहे.
वॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार, नवीन पोप निवडण्याठी परिषद आजपासूव सुरु झाली आहे. तर पोप निवडण्याची प्रक्रिया बुधवारपासून (07 मे) पासून सुरु करण्यात येणार आहे. जगभरातील 104 अब्ज कॅथलिकांसाठी नवीन पोपची निवड ऐतिहासिक असेल आहे. यामध्ये 71 देशांतून 133 कार्डिनल्स निवडणूकीत सहभागी होणार आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोण होतील नवे पोप? ‘हे’ आहेत जगातील सर्वात मोठे पाच चर्चित चेहरे
सध्या 71 देशांमध्ये 8 वर्षापेक्षा कमी वयाचे 135 कार्डिनल आहेत. यामध्ये दोन कार्डिनल आजाराच्या कारणास्तव निवडूकीत सहभागी होणार नाहीत. यामुले 133 किर्डिनल निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. पोप बनण्यासाठी एका कार्डिनला बहुमतांसाठी दोन तृतीयांश म्हणजे 89 मतांची आवश्यकता आहे.यामध्ये इटीलीचे 19 कार्डिनल्स आहेत. अमेरिकेचे 10, फ्रान्स आणि स्पेनचे 5 अर्जेटिना, कॅनडा, भारत, पोलंड आणि पोर्रतुगालमझून प्रत्येकी चार कार्डिनल्स निवडणूकीसाठी पात्र आहेत.
पोप धर्मगुरुची निवड अत्यंत गोपनीय आणि परंपरागत पद्धतीने करण्यात येते. याला पॅपल कॉन्क्लेव असे म्हटले जाते. जगभरातील कार्डिनल म्हणजे वरिष्ठ पाद्री एकत्र येतात आणि मदतदानाद्वारे नवीन पोपची निवड करतात. सध्या व्हॅटिकनमध्ये 235 कार्डिनल आहेत. यामध्ये 80 वर्षाखाली 138 कार्डिनला असून त्यांना मतदानाच हक्क आहे.
पोपच्या पदासाठी सर्व कार्डिन्सल्स गुप्त पद्धतीने मतदान करुन एका कार्डिनलची पोप पदी निवड करणार. सध्या पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूनंतर पोप पदासाठी पाच दावेदारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये कार्डिनल पिएट्रो पॅरोलिन, कार्डिनल पीटर एर्डो, कार्डिनल मॅटेओ झुप्पी, कार्डिनल रेमंड बर्क, कार्डिनल लुईस अँटोनियो टॅगल यांचा समावेश आहे.
पोप यांना ख्रश्चिन समुदायाचे सर्वात मोठे धर्मगुरु म्हणून ओळखले जाते. पोप यांच्याकड धार्मिक प्रशासकीय. राजकीय आणि सांस्कृतिक जबाबदारी असते. तसेच वॅटिकन सिटीचे प्रशासक म्हणून त्यांच्याकडे कार्यकारी कायदे आणि न्यायिक अधिकार असतात. सर्व बिशप आणि कार्डिनलची नियुक्तीची जबाबदारी पोप यांच्याकडे असते. चर्चच्या स्थानिक आणि जगाभरातील कामकाजावर त्यांचा प्रभाव असतो.
पोप यांना जागतिक स्तरावर एक मोठे आणि प्रभावी नेते म्हणून मान मिळतो. पोप यांच्याकडे आर्थिक, लष्करी ताकद नसली तरी जगातील देशांच्या नेत्यांशी पोप शांतता पर्यावरण, सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करु शकतात. जागतिक देशांमध्ये मध्यस्थी आणि शांततेची भूमिका बजावण्याचा त्यांच्याकडे हक्क असतो.