Peter Navarro Again Critisizes India
India US Relations : वॉशिंग्टन : सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारात तणाव आहेत. दोन्ही देशांनी चर्चा सुरु पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donaldf Trump) यांनी देखील भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे, तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींचेही (Nanrendra Modi) कौतुक केले आहे. परंतु ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांना हे पटलेले नाही. त्यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी विधान केले आहे. त्यांनी रशियाकडून तेल खरेदीवरुन पुन्हा एकदा भारतीयांवर राग आलापला आहे.
पीटर नावारो यांचा राग केवळ रशियाकडून तेल खरेदीवरुन नाही, तर त्यांच्या तथ्यांची तथ्य तपासणी आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही भारतविरोधी पोस्ट केल्या होत्या, ज्याला भारतीयांना ट्रोल केले. परंतु त्यांना या सर्वांचा राग भारतवार काढला आहे.
दरम्यान नवारो यांचा पोल पूर्णपणे उलटा पडला. अनेक लोकांना त्यांना विरोद केला. तसेच प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी देखील याला प्रत्युत्तर दिले होते. मस्क यांनी एक्स आणि ग्रोक सर्व तथ्य तपासून माहिती उघड करत आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही खोटी माहिती पसरवली जात नाही असे त्यांनी म्हटले. पण यामुळे पीटर नवारो हा अपमान सहन करुन शकले नाहीत आणि त्यांनी पुन्हा एकदा भारतीयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हॉले आहे की, भारताचे किबोर्ड मिनियन्स एक्स कम्युनिचीच्या नोट्स हायजॅक करत आहेत आणि त्याचा तथ्य लपवण्यासाठी गैरवापर करत आहेत. अमेरिकन बाजारपेठांमध्ये बिनधास्त घुसखोरी करता येत नसल्याने ते संतापले आहेत. तरीही भारत हा टॅरिफचा राजा आहे, आणि जगातील सर्वाधिक व्यापार अडथळे कायम ठेवत आहे.
🧵 India’s keyboard minions are hijacking X’s Community Notes to bury the facts.
They’re furious about losing unfettered access to U.S. markets—even as India, the Maharaja of Tariffs, keeps some of the world’s highest trade barriers. pic.twitter.com/d72WoebqIa
— Peter Navarro (@RealPNavarro) September 9, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताकडे मैत्रीचा हात
पीटर नवारो यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. याच वेळी त्यांनी युरोपियन युनियनकडे भारतावर १०० टक्के कर लादण्याची मागणी केली आहे.
या सर्व घडामोडींमुळे भारतामध्ये सध्या चिंतेच आणि गोंधळाचे वातावरण आहे. अमेरिकेला नेमकं भारतासोबत संबंध सुधारायचे आहेत की नाही असा प्रश्न पडला आहे.