
Trump offers Dana White Press Secretary job Dana White White House Press Secretary
अमेरिकेच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच रंजक बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वात मोठी मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) संस्था असलेल्या Ultimate Fighting Championship (UFC) चे प्रमुख डॅना व्हाईट यांना व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी (प्रेस सचिव) बनण्याची अधिकृत ऑफर दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) वर एक विशेष पोस्ट शेअर करत या प्रस्तावाची जाहीर घोषणा केली. ट्रम्प यांनी डॅना व्हाईट (Dana White) यांचे वर्णन एक “लढवय्या आणि खऱ्या अर्थाने योद्धा” असे केले असून, डॅना हे आतापर्यंतचे सर्वात प्रभावी आणि अतुलनीय प्रेस सेक्रेटरी ठरतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची ही ऑफर केवळ डॅना व्हाईट यांच्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. त्यांनी आपल्या प्रस्तावामध्ये डॅना यांना सहा आक्रमक आजी-माजी UFC फायटर्सना व्हाईट हाऊसमध्ये सहाय्यक म्हणून नियुक्त करण्याची थेट परवानगी दिली आहे. या यादीमध्ये रशियाचे स्टार फायटर्स इस्लाम मखाचेव आणि खबीब नूरमागोमेदोव्ह, अमेरिकेचे जस्टिन गेथजे, डॅनियल कॉर्मियर, कायला हॅरिसन आणि गेल्या वर्षी अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेली ब्राझिलियन फायटर अमांडा न्युन्स यांचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक शैलीत स्पष्ट केले की, ट्रम्प सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्या आणि प्रशासनाला त्रास देणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या राजकीय विरोधकांचा (Lunatic Left) सामना करण्यासाठी आपल्याला अशा धाडसी खेळाडूंची गरज आहे. व्हाईट हाऊसचे कम्युनिझम डायरेक्टर स्टीव्हन च्युंग यांनीही ट्रम्प यांच्या या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NZ Election : न्यूझीलंडमध्ये निवडणुकीनंतरही पेच; लक्सॉन बहुमताच्या जवळ पोहोचूनही सरकार स्थापनेस विलंब का?
ट्रम्प आणि डॅना व्हाईट यांचे नाते केवळ राजकीय नसून ते गेल्या दोन दशकांपासूनचे घट्ट मित्र आहेत. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला, जेव्हा UFC ला मुख्य प्रवाहात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, तेव्हा ट्रम्प यांनी अटलांटिक सिटीमधील आपल्या ताजमहाल कॅसिनोमध्ये UFC चे सामने आयोजित करण्यासाठी जागा दिली होती.
यानंतर २०१६, २०२० आणि २०२४ च्या रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये (RNC) डॅना व्हाईट यांनी ट्रम्प यांच्या समर्थनात मुख्य भाषणे दिली होती. अगदी अलीकडेच, अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून थेट व्हाईट हाऊसच्या दक्षिण लॉनवर UFC चा विशेष सामना आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी डॅना यांना प्रशासनात महत्त्वाचे पद देऊ केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Horizon Europe : भारताचा ‘होरायझन युरोप’मध्ये प्रवेश निश्चित; युरोपियन युनियनसोबतच्या वाटाघाटी यशस्वी, संशोधकांसाठी सुवर्णकाळ
व्हाईट हाऊसच्या इतिहासात प्रेस सेक्रेटरी पद हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे मानले जाते. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कॅरोलिन लेव्हिट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर केटी झकेरिया यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली, परंतु पहिल्याच पत्रकार परिषदेतील वादग्रस्त कामगिरीमुळे अवघ्या ५ दिवसांत त्यांना पदावरून हटवण्यात आले.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला असून डेमोक्रॅट्सनी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळवले आहे. या पराभवानंतर ट्रम्प प्रशासनात मोठे फेरबदल केले जात आहेत. ट्रम्प यांच्या माजी मुख्य सल्लागार सुझी वाईल्स यांना चीफ ऑफ स्टाफ पदावरून हटवण्यात आले असून, स्टीफन मिलर यांची नवीन चीफ ऑफ Staff म्हणून घोषणा झाली आहे. अशा काळात प्रशासनाची बाजू माध्यमांसमोर खंबीरपणे मांडण्यासाठी ट्रम्प यांनी डॅना व्हाईट यांच्यावर डाव खेळला आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी UFC प्रमुख डॅना व्हाईट यांना अमेरिकेच्या व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी (White House Press Secretary) पदाची ऑफर दिली आहे.
Ans: ट्रम्प यांनी डॅना व्हाईट यांना इस्लाम मखाचेव, खबीब नूरमागोमेदोव्ह, जस्टिन गेथजे, डॅनियल कॉर्मियर, कायला हॅरिसन आणि अमांडा न्युन्स यांना सहाय्यक म्हणून ठेवण्याची परवानगी दिली आहे.
Ans: कॅरोलिन लेव्हिट यांचा राजीनामा आणि केटी झकेरिया यांची ५ दिवसांत उचलबांगडी झाल्यानंतर हे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे.