धक्कादायक! नेपाळमध्ये हिंसक निदर्शनांदरम्यान Gen Z तरुण डान्स रिल बनवताना; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nepal Protest News in Marathi : काठमांडू : सध्या नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्यानंतरही अस्थिरतेचे वातावरण आहे. तणाव शिंगेला पोहोचला आहे. लोकांनी संसद जाळली आहे, अनेक नेत्यांना मारहाण केली आहे, तसेच त्यांच्या घरांनाही पेटवून दिले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरु आहे, परण अद्यापर सर्व अस्थाव्यस्थ झाले आहे. या सर्व घडामोडींदरम्यान सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण संसद जाळल्यानंतर समोर रिल बनवकताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून Gen Z वर टीका केली जात आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ Gen Z तरुणाचा आहे. देशात हिंसत निदर्शनाचे वातावरण असताना तरुण पेटवून दिलेल्या संसदेसमोर आनंदात नाचताना आणि गाणी म्हणत डान्स करताना दिसत आहे. तसेच याची रिलही बनवली जात आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये असा आंनद साजरा केल्यामुळे जगाला आश्चर्य वाचले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असनू तरुणावर टीका केली जात आहे.
सध्या नेपाळमधील परस्थितीत अत्यंत बिकट आहे. नेपाळची राजधानी काठमांडूसह देशाच्या अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने सुरु आहेत. आतापर्यंतच्या निदर्शनात १५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी लष्कराने सूत्रे हाती घेतली आहेत. पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
TIK TOK video after burning parliament pic.twitter.com/3yvifsYpPh
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 9, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ @gharkekalesh या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने छपरी Gen Z असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने मूर्खपणाचा कळस असे म्हटले आहे. आणखी एका युजरने आता हे Gen Z नियंत्रणाबाहेर गेले आहेत, असे म्हटले आहे. सध्या या व्हिडिओवर सर्वत्र टीका केली जात आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
नेपाळमध्ये का सुरु आंदोलन ?
भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे सरकारविरोधी आदंलोन सुरु झाले होते. एवढेच नव्हे, तर सरकारच्या भष्ट्राचाराविरोधात, बेरोजगारी, नेपोटिझम, या कराणामुळे हे आंदोलन अधिक तीव्र झाले.
काय होत्या आंदोलना कर्त्यांच्या मागण्या?
आंदोलनकर्त्यांनी म्हणजेच Gen Z नी पाच मागण्या केल्या होत्या. यामध्ये संसद बरखास्त करण्याची, पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. तसेच आंदोलन कर्त्यांवर गोळ्या झाडणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आणि अंतिरम सरकार स्थापन करण्याची मागणी केली जात होती.
काय आहे नेपाळमधील सद्य परिस्थिती?
सध्या नेपाळमध्ये अस्थिरकतेचे वातावरण आहे. लष्कराने देशाची सुत्रे हाती घेतली आहेत. परंतु अजूनही निदर्शने सुरुच आहेत. v
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.