Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवैध निर्वासितांचे हाल बघवेनात! डांबून ठेवलेल्या हॉटेलच्या खिडक्यांमधून देतायेत मदतीची हाक

US Deports Migrants: अमेरिकेतून हद्दपार केलेल्या 299 स्थलांतरितांना सध्या पनामाच्या एका हॉटेलमध्ये बंदिस्त ठेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवासी हे आशियाई देशातील आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 20, 2025 | 01:02 PM
'Please help us' illegal migrants that locked in panama hotel seeking for help, video

'Please help us' illegal migrants that locked in panama hotel seeking for help, video

Follow Us
Close
Follow Us:

पनामा: अमेरिकेतून हद्दपार केलेल्या 299 स्थलांतरितांना सध्या पनामाच्या एका हॉटेलमध्ये बंदिस्त ठेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवासी हे आशियाई देशातील असून यामध्ये भारत, इराण, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, आणि चीन सारख्या देशांतील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान या प्रवाशांनी हॉटेलच्या खिडक्यांमधून प्लेकार्ड दाखवत मदतीसाठी हाक मारली आहे. त्यांच्या हातातील पोस्टरवर “आमची मदत करा” आणि “आम्ही आमच्या देशात सुरक्षित नाही” असे लिहिलेले आहे.पनामाचा

ट्रांझिट पॉइंट म्हणून वापर

डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्पुरत्या काळासाठी अवैध प्रवाशांना ठेवण्याचा प्रस्ताव मांडला पनामा आणि ग्वाटेमाला, कोस्टा रिका या देशांकडे मांडला होता, जो मंजुर करण्यात आला. त्यानंतर प्रवाशांना सध्या पनामा येथे ठेवण्यात आले आहे. अमेरिकेला या प्रवाशांना थेट त्यांच्या देशात परत पाठवणे कठीण जात असल्याने पनामाचा ट्रांझिट पॉइंट म्हणून वापर केला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- US Deportation Drive: अवैध प्रवाशांच्या हद्दपारीच्या ट्रम्प यांच्या योजनेला ‘या’ देशांनीही दिला दुजोरा

अमेरिका आणि पनामा यांच्यातील करार

अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो यांच्या दौऱ्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीस अमेरिका आणि पनामा यांच्यात एक नवीन प्रवासन करार करण्यात आला. या कराराच्या अंतर्गत पनामाला अवैध प्रवाशांना तात्पुरत्या काळासाठी ठेवावे लागणार आहे. पनामाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या प्रवाशांना हॉटेलमध्ये आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत आणि त्यांच्या मायदेशी परतण्याची व्यवस्था केली जात आहे.

Scène surréaliste à Panama City.
Des migrants ont été expulsés des Etats-Unis, le Panama a accepté de les « accueillir ». Ils sont retenus dans un hôtel de la ville et tentent de communiquer avec l’extérieur. « Please help afghan girls » peut-on lire.#panama #migrants #trump pic.twitter.com/isCK75F3LE

— Thierry Coiffier (@TCoiffier) February 18, 2025


प्रवाशांची मदतीसाठी हाक

मात्र, याचदरम्यान हॉटेलमध्ये बंदिस्त असलेल्या या प्रवाशांनी खिडक्यांमधून मदतीची हाक मारल्याने पनामावर तीव्र टीका केल्या जात आहेत. सध्या हे प्रवासी खिडक्यांणधून मदत मागत असल्याची छायाचित्रेसमोर आली आहे. यामध्ये प्रवासी खिडक्यांमधून बाहेर पाहत असून पोस्टवर दाखवत आहेत. काही प्रसारमाध्यमांनी ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या पोस्टरवर प्रवाशांनी त्यांच्या असुरक्षिततेविषयी आणि कठीण परिस्थितीविषयी लिहिले आहे.

दरम्यान पनामाचे मंत्री फ्रँक अब्रेगो यांनी, अवैध प्रवाशांना हॉटेलमध्ये चांगली सोय करून देण्यात आली असल्याचे म्हटले आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना हॉटेलबाहेर जाण्याची परवानगी नसल्याचे सांगितले.

प्रवाशांच्या परतीची सोय

या 299 प्रवाशांपैकी 171 जण स्वच्छेने त्यांच्या मूळ देशात परत जाण्यास तयार आहेत. या परतीच्या प्रक्रियेसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासन संघटना (IOM) आणि संयुक्त राष्ट्र शरणार्थी संस्था (UNHCR) मदत करत आहेत. मात्र, उर्वरित प्रवासी, आपल्या देशात परतण्यास इच्छुक नाहीत.

त्यांना पनामाच्या डेरियन प्रांतातील एका सुविधा केंद्रात ठेवण्यात येणार आहे. ही परिस्थिती पाहता, या निर्वासित प्रवाशांच्या भविष्यासंदर्भात मोठी अनिश्चितता आहे. पनामाच्या सरकारवर दबाव वाढत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशची उडाली झोप; अमेरिकेची हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोठी कारवाई

Web Title: Please help us illegal migrants that locked in panama hotel seeking for help video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 01:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.