PM Modi arrives in Namibia for frist ever official visit video
विंडहोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अधिकृत राज्य देशांच्या दौऱ्यावर आहे. सध्या ते शेवटच्या टप्प्यात नामिबियात पोहोचले आहे. हा दौरा भारत आणि नामिबियातील धोरणात्मक भागीदारीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान मोदी नामिबियात पोहचल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले. गेल्या तीस वर्षात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच नामिबियाचा दौरा आहे.
या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि नामिबियाचे अध्यक्ष नेतुम्बो नंदी-नदाटवाह यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक चर्चा होणार आहे. तसेच यामध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधीमंडळाचा देखील समावेश आहे.
#WATCH | PM Narendra Modi receives traditional welcome on his arrival in Windhoek, Namibia
The PM tries his hand at playing the Namibian traditional drums.
(video source: DD) pic.twitter.com/QnnoCeVLRx
— ANI (@ANI) July 9, 2025
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी नामिबियाच्या संसदेला संबोधित करणार आहेत. हा एक ऐतिहासिक प्रसंग असणार आहे. यावेळी भारतीय पंतप्रधान पहिल्यांदाच आफ्रिकन देशाच्या संसदेत भाषण करणार आहे. तसेच नामिबियाचे पहिले राष्ट्रपती डॉ. सॅम नुजोमा यांना पंतप्रधान मोदी श्रद्धांजली वाहतील.
या भेटीचा मुख्य उद्देश भारताची डिजिटल पेमेंट सिस्टिम युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस नामिबियामध्ये सुरु करणे आहे. यासाठी एनसीपीसीआय आणि सेंट्रल बॅंक ऑफ नामिबियातमध्ये एक महत्त्वपूर्ण करार करण्यात येणार आहे. ही भेट भारत आणि नामिबियाच्या वाढत्या संबंधांसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे.