'या' दहशतवादी संघटनेचे पाकिस्तानवर आहे नियंत्रण; संयुक्त राष्ट्रामध्ये पाकच्या राजदूतांचा मोठा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News Marathi : इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानबाबत अनेक धक्कादायके खुलासे होत आहे. 22 एप्रिल रोजी भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे अनेक पुरावे भारताने जागतिक स्तरावर सादर केले आहेत. अनेकांनी पाकिस्तान गेल्या अनेक काळापासून दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचेही मानले आहे. परंतु याउलट पाकिस्तान स्वत:ला दहशतवादाचा बळी समजतो.
दरम्यान स्वत:ला दहशतवादाचा बळी समजणाऱ्या पाकिस्तानने आणखी एक मोठा धक्कादायक दावा केला आहे. पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवादाचा बळी म्हणून वर्णिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानवर दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबानचे नियंत्रण आहे. टीटीपी ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये दहशत पसरवत आहे. या संघटनेमुळे सध्या पाकिस्तानमध्ये रक्त्याच्या नद्या वाहत असल्याचे म्हटले आहे. असीम यांनी सांगितले की, या टीटीपी दहशतवादी संघटनेकडे सहा हजार लढाऊ सैनिक आहे. तसेच ही संघटना अजूनही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे.
असीम अहमद यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सांगतिले की, टीटीपी दहशतवादी संघटना अफगाणिस्तानच्या भूमीवर सक्रिय आहे. तसेच अनेक दहशवाद्यांना जन्माला घालत आहे. असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये सध्या पाच दहशतवादी संघटना आहेत. यामध्ये सर्वात धोकादायक संघटना म्हणजे तहरिक-ए-तालिबान (टीटीपी) ही दहशतवादी संघटना आहे.
या संघटनेशिवाय, आयएसआयएल-के(दाएश), अल-कायदा आणि बलुच लिबरेशन फ्रंट या संघटना सध्या पाकिस्तानमध्ये सक्रिय आहेत. या दहशतवादी संघटनांमुळे पाकिस्तानमध्ये जीवन कठीण झाले असल्याचे असीम अहमद यांनी म्हटले. त्यांनी संयुक्त राष्ट्रांकडे यावर नियंत्रण आणण्यासाठी मदतीची मागणी देखील केली.
मिळालेल्या माहितीनुसार, २००७ मध्ये पाकिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान टीटीपी या संघटनेची स्थापना झाला. तालिबानकडून या संघटनेला पूर्ण पाठिंबा मिळाला होता. ही संघटना लष्कराच्या जुलूमशाहीपासून लोकांना मुक्त करण्याचे काम करते. ही संघटना सध्या पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सक्रिय आहे.मुल्ला फजलुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. पाकिस्तान सरकारने अफगाणिस्तान या संघटनेला शस्त्रांचा पुरवठा करतो असा दावा केला आहे. यामुळेच सध्या ही संघटना पाकिस्तानच्या सैन्याला ठार करत आहे.
ग्लोबल टेरर इंडेक्सनुसार, टीटीपी ही जगातील तिसरी धोकादायक दहशतवादी संघटना आहे. या संघटनेमुळे पाकिस्तानमध्ये २०२४ मध्ये ५८८ लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये लष्करी सैन्य आणि अधिकाऱ्यांचा सामवेश होता. सध्या पाकिस्तानमध्ये टीटीपीमुळे ४८२ दहशतवादी हल्ले झाले आहेत. सध्या ही संघटना जगभरात दहशतवाद पसरवण्यात आघाडीवर आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या १५० हून अधिक लोकांना या संघटनेने ठार केले आहे.