Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमध्ये नवा राजकीय अध्याय सुरु! PM मोदींनी पहिल्या महिला पंतप्रधान सुशीला कार्कींना दिल्या शुभेच्छा

PM Modi Congratulate Nepal's New Interim PM : नेपाळमध्ये एक नवा अध्याय सुरु झाला आहे. नेपाळच्या अंतरिम सरकारची सूत्रे सुशीला कार्की यांनी हाती घेतली आहे. यावर पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 13, 2025 | 11:37 AM
PM Modi congratulate Nepal News Interim PM shushila Karki

PM Modi congratulate Nepal News Interim PM shushila Karki

Follow Us
Close
Follow Us:
  •  सुशीला कार्की बनल्या नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान
  • पंतप्रधान मोदींनी  कार्की यांचे केले अभिनंदन
  • भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही नेपाळच्या नव्या महिला पंतप्रधानांचे केले स्वागत

PM Modi Congratualte Susila Karki : काठमांडू : नेपाळच्या राजकराणात एक नवा अध्याय सुरु झाला आहे. देशाच्या माजी महिला सर न्यायाधीश सुशीला कार्की यांनी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. शुक्रवारी (१२ सप्टेंबर) त्यांनी नेपाळच्या अंतरिम सरकारची सूत्रे हाती घेतली. जनरेशन-झेडच्या हिंसक आंदोलनानंतर एक आठवड्यानंतर नेपाळमध्ये स्थिरता आली आहे. दरम्यान या नव्या राजकीय बदलावर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांना नव्या पर्वासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

पंतप्रधान मोदींनी केले सुशीला कार्की यांचे अभिनंदन

तसेच पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या शांततेसाठी भारताचा पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यांसर्भात पोस्ट केली आहे. पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले की, “नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल माननीय सुशीला कार्की यांचे हार्दिक अभिनंदन. भारत नेपाळच्या बंधूभगिनींच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.”

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया 

या संदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शेजारी देश नेपाळच्या नागरिकांच्या भल्यासाठी भारत सहकार्य सुरु ठेवण्याची हमी देतो. तसेच आम्ही माननीय श्रीमती सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये नव्या अंतिरम सरकारच्या स्थापनेचेही स्वागत करतो. भारताला आशा आहे की, या नव्या बदलामुळे नेपाळमध्ये शांतता आणि स्थिरता वाढेल. हे भारताच्या संतुलित आणि सकारात्मक धोरणाचे प्रतिबिंब आहे.

नेपाळच्या पंतप्रधानपदी Sushila Karki; राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने घेतली शपथ

नेपाल की अंतरिम सरकार की प्रधानमंत्री के रूप में पद ग्रहण करने पर माननीय सुशीला कार्की जी को हार्दिक शुभकामनाएं। नेपाल के भाई-बहनों की शांति, प्रगति और समृद्धि के लिए भारत पूरी तरह से प्रतिबद्ध है।

— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2025

नेपाळमध्ये राजकीय बदल कसा घडला? 

  • नेपाळमध्ये माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या सरकारने ४ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे ८ आणि ९ सप्टेंबर रोजी सरकारच्या या निर्णयाविरोधात जनरेशन-झेडच्या तरुणांनी आंदोलन सुरु केले.
  • सुरुवातील हे आंदोलन शांततेने सुरु होते, पण हळहळू  आंदोलनाने तीव्र रुप धारण केले. संतप्त झालेल्यांनी आणि ओली सरकारच्या भ्रष्टाचार, देशातील बेरोजगारी आणि नेपोटिझ विरोधात बंड पुकारला.
  • आंदोलन तीव्र पेटले आणि ओली शर्मा यांच्या आणि सरकारमधील इतर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मंत्र्यांना मारहाण करण्यात आली. अनेक लोकांवर हल्ले झाले, २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच ३०० हून अधिक जखमी झाले.
  • बिघडती परिस्थिती पाहता ओली शर्मा यांनी राजीनामा दिला. त्यानंतरही परिस्थिती सुधारलेली नव्हती, देशात मोठ्या प्रमाणात अस्थिरता होतीच. अंतरिम सरकारच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरु होते.
  • दरम्यान अंतरिम सरकारच्या पंतप्रधान पदासाठी सुशीला कार्की, बालेंद्र शाह आणि कुलमन घिसिंग यांची नावे समोर आली होती.
  • अखेर १२ सप्टेंबर रोजी लष्कर आणि जनरेशन-झेडच्या तरुणांनी सहमतीने सुशीला कार्की यांना पंतप्रधान पदसाठी निवडले आणि संध्याकाळी कार्की यांनी अंतरिम सरकारच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

FAQs(संबंधित प्रश्न) 

नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन? 

नेपाळमध्ये ओली सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार, नेपोटिझम आणि देशातील बेरोजगारी या सर्व कारणांमुळे तरुणांनी आंदोलन छेडले होते.

नेपाळच्या अंतरिम सरकारची सूत्रे कोणी हाती घेतली? 

नेपाळच्या अंतरिम सरकारची सूत्रे माजी पहिल्या महिला सर न्यायाधीश सुशीला कार्की यांनी घेतली आहेत. १२ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केली.

पंतप्रधान मोदींनी कोणाचे केले अभिनंदन? 

भारतीय पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या पहिला महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या सुशाली कार्की यांचे अभिनंदन केले.

शिवपुरीच का ठरले माजी पंतप्रधान ओलींचे ‘Safe House’ ; संकटकाळी नेपाळच्या कोणत्या नेत्यांनी घेतला येथे आसरा?

Web Title: Pm modi congratulate nepal news interim pm shushila karki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Nepal News

संबंधित बातम्या

Sushila Karki New PM of Nepal: सुशीला कार्की यांनी घेतली नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ
1

Sushila Karki New PM of Nepal: सुशीला कार्की यांनी घेतली नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ

नेपाळच्या पंतप्रधानपदी Sushila Karki; राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने घेतली शपथ
2

नेपाळच्या पंतप्रधानपदी Sushila Karki; राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने घेतली शपथ

ठरलं तर! सुशीला कार्कींच्या हाती नेपाळची सूत्रे; आज रात्री घेणार अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ
3

ठरलं तर! सुशीला कार्कींच्या हाती नेपाळची सूत्रे; आज रात्री घेणार अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ

VIRAL VIDEO : भाऊ चुकून स्वातंत्र्यसैनिकच बनला! ‘हा’ प्रसिद्ध परदेशी ब्लॉगर फिरण्यासाठी गेला आणि सत्तापालट करूनच परतला
4

VIRAL VIDEO : भाऊ चुकून स्वातंत्र्यसैनिकच बनला! ‘हा’ प्रसिद्ध परदेशी ब्लॉगर फिरण्यासाठी गेला आणि सत्तापालट करूनच परतला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.