Pope Leo Criticise Elon Musk Wealth
Pope Leo Criticise Elon Musk Wealth: गेल्या काही काळात प्रसिद्ध उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होत आहे. यामुळे जगभरात चर्चेचा विषय बनत आहे. मात्र याच वेळी जगातील सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांनी टेस्लोचे सीईओ एलॉन मस्क यांच्या वाढत्या संपत्तीवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मस्क यांची वाढती संपती जगासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
कॅथोलिक न्यूज वेबसाइट क्रक्सला दिलेल्या त्यांच्या पहिल्या मुलाखतीदरम्यान पोप लिओ यांनी हे विधान केले. त्यांनी म्हटले की, कंपनीच्या सीईओंचा पगार हा कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे त्यांच्या पगारांबद्दल ते चिंतेत आहे.
काश पटेल यांचे FBIचे संचालक पद धोक्यात? चार्ली कर्कच्या हत्येप्रकरणी होत आहे जोरदार टीका
श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब गरीबच राहत आहे?
पोप लिओ यांच्या मते दशकभरापूर्वी एलॉन मस्क यांच्यासारख्या सीईओंचे पगार हे सामान्य कर्मचाऱ्यांच्या सहाा पटीने अधिक होते. मात्र आता याामध्ये ६०० पटीने वाढ झाली आहे. त्यांचे मते जगभरातील श्रीमंत लोकांचे पगार, त्यांची संपत्ती वाढत आहे. मात्र सामान्य नागरिक, कर्मचारी, शेतकरी यांची परिस्थिती जवळपास दशकभरापूर्वी सारखीच राहिली आहे. मस्क यांच्या मुद्यांवर त्यांनी अधिक भर दिली आहे.
फोर्ब्सनुसार, एलॉन मस्क यांची संपत्ती सध्या ४६३. २ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. येत्या काळात यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता पोप लिओ यांनी व्यक्त केली. पोप लिओ यांच्या मते जगभराती संपत्ती मोजक्या लोकांच्या हातात जात, असून हा सामान्य लोकांसाठी अत्यंत मोठा धोका आहे. यामुळेच जगभरात सध्या आंदोलने, हिंसक निदर्शनांची सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती भारत, अमेरिका, ब्रिटन आणि युरोप अशा अनेक देशांमध्येही निर्माण होण्याची भीती पोप लिओ यांनी व्यक्त केली आहे.
OXFAM ने मार्च २०२५ मध्ये जारी केलेल्या अहवालानुसार, २०१९ ते २०२४ दरम्यान सीईओंच्या पगारात ५०% वाढ झाली आहे, तर कर्चाऱ्यांच्या पगारात केवळ ०.९ टक्के वाढ झाली आहे. यामुळे देशात महागाई, उर्जा दर वाढत आहे. यामुळेच लोकांमध्ये रोष वाढत आहे.
ॲमेनेस्टी इंटरनॅशनलने दिलेल्या अहवालानुसार, २०२२ मध्ये १९३ देशापैकी आतापर्यंत १४८ देशात महागाई वाढल्याने आंदोलने झाली आहे. नेपाळ, बांगलादेश, फ्रान्स, इंडेनेशिया, ब्राझील, आणि आता फिलिपिन्समध्ये ही आंदोलने होत आहेत. यामध्ये विशेष करुन तरुणांचा समावेश आहे. पोप लिओ यांच्या विधानाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
पोप लिओ यांनी कशाबद्दल केली चिंता व्यक्त?
जागतिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांनी देशातील श्रीमंत सीईओंच्या एलॉन मस्कसारख्या लोकांच्या वाढत्या संपत्तीवर आणि देशातील सामान्य नागरिकांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
पोप लिओ यांनी कशाची भीती केली व्यक्त?
पोप लिओ यांच्या मते, सीईओंच्या वाढत्या संपत्तीमुळे जगभरातील सामान्य लोक, कामगार वर्ग, शेतकरी लोकांच्या परिस्थिती बिकट होण्याची आणि जगभरात हिंसक आंदोलने वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
‘निर्णय चीनवर अवलंबून…’ ; अमेरिकेतील टीकटॉक बंदीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा ड्रॅगनला इशारा