Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hajj ला जाताय? यात्रेपूर्वी करुन घ्या हेल्थ चेक-अप; पालिकेच्या दोन रुग्णालयांत विशेष सोय

सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविकांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने देखील हजसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची वैद्यकीय त्तपासणी आणि लसीकरण आयोजित केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2026 | 02:42 PM
Medical check-ups for Hajj pilgrims arrangements at mumbai municipal hospitals

Medical check-ups for Hajj pilgrims arrangements at mumbai municipal hospitals

Follow Us
Follow Us:
  • हज यात्रेकरूंसाठी वैद्यकीय तपासणी
  • दोन पालिका रुग्णालयात व्यवस्था
  • ६५ वर्षांवरील यात्रेकरूंना एसआयव्ही लस दिली जाणार
Hajj Piligrimage : मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: हज (Hajj) २०२६ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची वैद्यकीय त्तपासणी आणि लसीकरण सक्तीचे करण्यात आले असून, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय केंद्रांचा वापर करण्यात येणार आहे. सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविकांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य केली असून, काही ठरावीक आजार आढळल्यास संबंधित यात्रेकरूंना ‘अनफिट’ घोषित करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : हज यात्रेला आता डिजिटल सुरक्षा; Nusuk Card शिवाय करता येणार नाही सौदीचा प्रवास, जाणून घ्या माहिती

मुंबई आणि उपनगरातून सुमारे चार हजार यात्रेकरू हजसाठी जाणार असल्याने राज्य हज समिती आणि महापालिका प्रशासनात याबाबत चर्चा होऊन कूपर रुग्णालय आणि बालासाहेच ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर या दोन रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ३०० यात्रेकरूंच्या तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेकरूंना १५० जणांच्या गटात विभागून तपासणी व लसीकरण प्रक्रिया राबवली जाणार असून, प्रत्येक गटासाठी प्रशिक्षक नेमण्यात आला आहे.

६५ वर्षांवरील यात्रेकरूंना एसआयव्ही लस दिली जाणार

यात्रेकरूंनी तपासणीसाठी स्वतःची वैद्यकीय नौद तसेच ताजे अहवाल सोबत आणणे आवश्यक असून यात रक्तातील साखर तपासणी, मूत्रपिंड कार्य तपासणी, यकृत कार्य तपासणी, एक्स-रे, ईसीजी, महिलासाठी गर्भधारणा तपासणी आणि गर्भवती असल्यास सोनोग्राफी यांचा समावेश आहे, प्राथमिक अहवालात काही त्रुटी आढळल्यास अतिरिक्त तपासण्या महापालिकेच्या केंद्रांत करण्यात येतील.

लसीकरणाबाबत कळविण्यात आले की, सर्व ‘फिट’ यात्रेकरूंना क्यूएमएमकी लस देण्यात येईल, ६५ वर्षांवरील यात्रेकरूना एसआयव्ही लस दिली जाणार असून, ओपीव्ही लस देण्यात येणार नाही, कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र आरोग्य कार्डावर नमूद करणे बंधनकारक आहे. आरोग्य कार्ड भरण्याची जबाबदारी हज समितीच्या प्रशिक्षकांकडे राहाणार असून, त्याच माहितीची नोंद आरोग्य पोर्लटवर करण्यात येणार आहे.

हज यात्रेला आता डिजिटल सुरक्षा

याशिवाय सौदी अरेबियाने हजा यात्रेसाठी आणखी एक नवा नियम लागी केला आहे. गेल्या काही काळात या यात्रेसाठी प्रचंड गर्दी वाढत आहे. यामुळे वाढती गर्दी टाळण्यासाठी आणि अवैध घुसखोरी रोखण्यासाठी सौदी सरकारने नवे डिजिटल कार्ड लॉन्च केले आहे. या कार्डमुळे हज यात्रेकरुंचा प्रवास अधिक सुखाचा होईल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय यात्रेकरुंची एक डिजिटल ओळख तयार केली जाणार असून यासाठी एक Nusuk Card तयार करण्यात आले आहे.

काय आहे हज यात्रा?

दरवर्षी सौदी अरेबियामध्ये मक्का आणि मदिना येथे हज तीर्थ यात्रेचे आयोजन केले जाते. ही यात्रा जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक हज स्तंभ आहे. या यात्रेसाठी जगभरातून मोठ्या संख्येने लोक येतात.

हे देखील वाचा : Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा

Web Title: Medical checkup for hajj pilgrims arrangements at mumbai municipal hospitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Hajj Pilgrimage
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.