Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कहाणी आहे ‘या’ हजार वर्ष जुन्या शिव मंदिराची, जे बनले आहे थायलंड-कंबोडियामधील संघर्षाचा केंद्रबिंदू

Preah Vihar temple dispute : एकेकाळी केवळ भक्तांच्या प्रार्थनांनी भरून राहणारे मंदिराचे प्रांगण आज बंदुकीच्या आवाजांनी हादरत आहे. काय आहे नक्की यामागची रंजक कहाणी वाचा सविस्तर...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 02, 2025 | 05:00 PM
Preah Vihar Ancient temple at the heart of Thai-Cambodian conflict

Preah Vihar Ancient temple at the heart of Thai-Cambodian conflict

Follow Us
Close
Follow Us:

Preah Vihar temple dispute : एकेकाळी केवळ भक्तांच्या प्रार्थनांनी भरून राहणारे मंदिराचे प्रांगण आज बंदुकीच्या आवाजांनी हादरत आहे. ही आहे कथा ‘प्रेह विहार’ मंदिराची, जे सुमारे एक हजार वर्षे जुने हिंदू मंदिर असून, आज थायलंड आणि कंबोडिया या दोन शेजारी देशांमधील वादाचे केंद्रबिंदू बनले आहे.

हा संघर्ष इतका गहिरा आहे की त्याने थायलंडचे पंतप्रधान पतोंगथॉर्न शिनावात्रा यांच्यावरही परिणाम केला. २ जुलै २०२५ रोजी थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने त्यांना निलंबित केले. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी एका वरिष्ठ कंबोडियन नेत्याशी गुप्त आणि जवळचे संबंध ठेवले. एका लीक झालेल्या फोन कॉलमध्ये त्यांनी त्याला ‘काका’ संबोधले होते, आणि हाच संवाद थायलंडमध्ये राजकीय वादळाचे कारण बनला.

प्राचीन मंदिराचा राजकीय रणांगणात बदल

प्रेह विहार मंदिर हे ९व्या शतकात ख्मेर सम्राट सूर्यवर्मन I यांनी भगवान शिवासाठी बांधलेले प्राचीन मंदिर आहे. सध्या हे मंदिर कंबोडियाच्या सीमावर्ती प्रांतात स्थित असले तरी, थायलंडचा दावा आहे की मंदिराचा काही भाग त्यांच्या भूभागात येतो. २००८ मध्ये युनेस्कोने या मंदिराचा जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश केल्यानंतर वाद अधिक भडकला. त्यानंतरच्या काही वर्षांत  विशेषतः २००८ ते २०११ दरम्यान – सीमांवर अनेक वेळा गोळीबार, संघर्ष, आणि मृत्यू झाले. हजारो नागरिकांना आपले घरदार सोडावे लागले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गनपावडरच्या सावलीत ‘Hormuz’! भारत-चीन तेल मार्ग नष्ट करण्याचा इराणचा हेतू, समोर आले भयानक सत्य

पुन्हा एकदा उफाळलेला वाद

२८ मे २०२५ रोजी, या सीमावादाने पुन्हा हिंसक स्वरूप घेतले. कंबोडियाच्या दाव्यानुसार, त्यांच्या सैन्याने मंदिराच्या परिसरात नियमित गस्त घालत असताना थाई सैनिकांनी अचानक हल्ला केला. दुसरीकडे थायलंडचे म्हणणे आहे की गोळीबाराची सुरुवात कंबोडियाकडून झाली. या संघर्षात एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला, ज्यामुळे वातावरण अधिक चिघळले. १ जून रोजी, कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी हा विषय थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) नेण्याचा निर्णय घेतला. त्यांना संसदेतही पाठिंबा मिळाला. जरी थायलंड ICJ चे अधिकारक्षेत्र मान्य करत नसेल, तरी १४ जून रोजी दोन्ही देशांनी संयुक्त सीमा समितीद्वारे वाटाघाटी करण्याचे मान्य केले.

Thailand and Cambodia are disputing the Preah Vihear Temple again. The yellow star marks our homestead’s location. Can’t the warmongers relax? I’m not concerned; this happens periodically. Our PM was just ousted too, but at least it wasn’t another militery coup. pic.twitter.com/Tg5inMwi4u — GreenEvolutions (@Green3volutions) July 1, 2025

credit : social media

आता ASEAN कडे अपेक्षा, पण प्रतिक्रिया नाही

२०११ मध्ये जेव्हा संघर्ष शिगेला पोहोचला होता, तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) हे प्रकरण ASEAN संघटनेकडे सोपवले होते. इंडोनेशियाच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी सीमा निरीक्षक पथकांस मान्यता दिली होती. मात्र, यावेळी संघर्ष उफाळूनही ASEAN कडून कोणताही ठोस प्रतिसाद समोर आलेला नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : उत्तराधिकारी कोण? दलाई लामा यांनी केला खुलासा आणि चीनला दिले जशास तसे उत्तर

इतिहास, श्रद्धा आणि राजकारण एकाच वेळी भिडले!

प्रेह विहार मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नसून, दोन देशांमधील राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक बनले आहे. हे मंदिर कितीही पवित्र असले, तरी त्याभोवतीचे राजकीय आणि भौगोलिक वाद दिवसेंदिवस उग्र होत चालले आहेत. इतिहासाचा हा मौल्यवान वारसा रक्ताने माखला जाऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थी आणि शांततामूलक संवाद गरजेचा आहे. अन्यथा, एक हजार वर्षे जुने मंदिर हे यापुढेही संघर्षाचे कारण ठरत राहील.

Web Title: Preah vihar ancient temple at the heart of thai cambodian conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • shiv temples
  • thailand

संबंधित बातम्या

हॉटेल रूममध्ये भीतीचा थरार! बेडवर झोपलेल्या कपलजवळ पोहोचला किंग कोब्रा, मग पुढे काय घडलं? पाहा Viral Video
1

हॉटेल रूममध्ये भीतीचा थरार! बेडवर झोपलेल्या कपलजवळ पोहोचला किंग कोब्रा, मग पुढे काय घडलं? पाहा Viral Video

थायलंडमध्ये घुमणार मराठी संस्कृतीचा डंका! फुकेतमध्ये ‘दगडूशेट गणपती’ मंदिराची प्रतिकृती; भारतीयांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी
2

थायलंडमध्ये घुमणार मराठी संस्कृतीचा डंका! फुकेतमध्ये ‘दगडूशेट गणपती’ मंदिराची प्रतिकृती; भारतीयांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी

रॅम्प वॉक करताना मॉडेलचे नकली दात गळून पडले, स्टेजवरच घडलेला तो लज्जतस्पद प्रकार पण तिने जे केलं… Video Viral   Miss Grand Thail
3

रॅम्प वॉक करताना मॉडेलचे नकली दात गळून पडले, स्टेजवरच घडलेला तो लज्जतस्पद प्रकार पण तिने जे केलं… Video Viral Miss Grand Thail

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.