Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींचं न्यूयॉर्कमध्ये जोरदार स्वागत, आज UN मध्ये योग दिनाचं करणार नेतृत्व

न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावर आलेल्या प्रवासी भारतीयांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या मोठ्या संख्येने अनिवासी भारतीयांशी हस्तांदोलन केले आणि संवाद साधला. यावेळी अनिवासी भारतीयांनी भारत मातेचा जयघोष केला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 21, 2023 | 08:51 AM
पंतप्रधान मोदींचं न्यूयॉर्कमध्ये जोरदार स्वागत, आज UN मध्ये योग दिनाचं करणार नेतृत्व
Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (PM Narendra Modi ) अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.  मंगळवारी सकाळच्या सुमारास ते न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. शहरातील जॉन एफ केनेडी विमानतळावर आलेल्या प्रवासी भारतीयांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या मोठ्या संख्येने अनिवासी भारतीयांशी हस्तांदोलन केले आणि संवादही साधला. यावेळी अनिवासी भारतीयांनी भारत मातेचा जयघोष केला. आज संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित योग दिन सोहळ्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करणार आहेत.

[read_also content=”‘प्रवास नतरं आधी या पोरींना आवरा’, मेट्रोमध्ये केस स्ट्रेट करणाऱ्या तरुणीवर भडकले लोकं; म्हणाले ही मेट्रो आहे की ब्युटी पार्लर? https://www.navarashtra.com/viral/a-girl-straightening-her-hair-in-the-delhi-metro-video-goes-viral-nrps-418777.html”]

न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट न्यूयॉर्कला पोहोचल्याची माहिती दिली. ते म्हणाले की,  21 जून रोजी योग दिन कार्यक्रमात सामील होण्यासाठी आणि नेत्यांसोबत विचार सामायिक करण्यासाठी उत्सुक आहोत. यासोबतच पीएम मोदींनी न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर काही फोटोही शेअर केले आहेत.

Landed in New York City. Looking forward to the programmes here including interaction with thought leaders and the Yoga Day programme tomorrow, 21st June. pic.twitter.com/6V5gHglLCg — Narendra Modi (@narendramodi) June 20, 2023

न्यूयॉर्क दौऱ्यात काय?

न्यूयॉर्कच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी सीईओ, नोबेल पारितोषिक विजेते, अर्थतज्ज्ञ, कलाकार, वैज्ञानिक, अभ्यासक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटतील.23 जून रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन संयुक्तपणे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करतील. याशिवाय, पंतप्रधान सीईओ आणि भारतीय डायस्पोरा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटतील.

परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी माहिती दिली की, पंतप्रधान मोदी 24-25 जून रोजी इजिप्तला भेट देणार आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. येथील 11व्या शतकातील वोहरा समाजाच्या अल-हकीम मशिदीला ते भेट देतील. पहिल्या महायुद्धात इजिप्तसाठी लढताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांनाही ते श्रद्धांजली अर्पण करतील. यासोबतच अनेक करारांवरही स्वाक्षऱ्या होणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी अमेरिकन वृत्तपत्राला मुलाखत दिली

अमेरिकेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉल ऑफ स्ट्रीट जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. पीएम मोदींनी ट्विट केले की वॉल स्ट्रीट जर्नलशी झालेल्या संभाषणात त्यांनी भारत-अमेरिका संबंधांवर आपले विचार मांडले. वॉल ऑफ स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, संभाषणादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यातील संबंध खूप मजबूत आणि खोल आहेत.

पंतप्रधानांनी मुलाखतीत काय म्हटले

मुलाखतीदरम्यान, पंतप्रधान म्हणाले की मी स्वतंत्र भारतात जन्मलेला पहिला पंतप्रधान आहे, त्यामुळे माझी विचार प्रक्रिया, आचार, मी जे काही बोलतो आणि करतो ते सर्व माझ्या देशाच्या वैशिष्ठ्य आणि परंपरांनी प्रेरित आणि प्रभावित आहेत. हे मला बळ देते. माझा विश्वास आहे की भारत जागतिक स्तरावर अतिशय उच्च, खोल आणि व्यापक व्यक्तिरेखा आणि भूमिका निभावण्यास पात्र आहे. पीएम मोदी पुढे म्हणाले की, सुरक्षा परिषदेतील विद्यमान सदस्यत्वाचे मूल्यांकन व्हायला हवे. जगाला विचारले पाहिजे की परिषदेत भारत हवा आहे का? भारत संपूर्ण जगात शांतता राखण्यासाठी लष्करी योगदान देणारा महत्त्वाचा देश आहे. आज जागतिक राजकारण ते अर्थव्यवस्थेत भारताच्या भूमिकेची वेळ आली आहे.

Web Title: Prime minister modi received a warm welcome in new york will lead the yoga day at the un today nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2023 | 08:51 AM

Topics:  

  • jo biden
  • narendra modi
  • new york

संबंधित बातम्या

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
1

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?
2

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?

फक्त भारतातच नव्हे तर न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरही खड्डेच खड्डे! सर्वात सुंदर शहराचे धक्कादायक वास्तव उघडकी, Video Viral
3

फक्त भारतातच नव्हे तर न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरही खड्डेच खड्डे! सर्वात सुंदर शहराचे धक्कादायक वास्तव उघडकी, Video Viral

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?
4

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.