पतंप्रधान नरेंद्र मोदी 21 व्यां आशियाई-भारत शिखर परिषदेत होणार सहभागी; व्हिएंटियानला देणार भेट
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी व्हिएंटियानला भेट देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालच्या विभागने दिलेल्या माहितीनुसार लाओ पीपल्स डेमोक्रटिक रिपब्लिकन पक्षाचे पंतप्रधान सोनेक्से सिफंडन यांनी भारताला आमंत्रण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएंटियानला 21 व्यां आशियाई-भारत शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भेट देणार आहेत. परराष्ट विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी 10-11 ऑक्टोबर रोजी व्हिएंटियान मध्ये लाओ पीडीआरला भेट देणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्याने पंतप्रधान 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत देखील सहभागी होणार आहेत. या सम्मेलनाचे आयोजन लाओ PDR द्वारे केले जाते. जे सध्या आशियाई-भारत परिषदेचे अध्यक्ष आहेत. याआधी झालेल्या परिषदेस भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 20 आणि 21 सप्टेंबर राजी व्हिएंटियानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी 21 व्यां आशियाई-भारत आर्थिक मंत्र्यांच्या बैठकीत हजेरी लावली होती. तसेच यादरम्यान 12 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या आर्थिक मंत्र्यांच्या बैठकीतही पीयूष गोयल सहभागी झाले होते.
परिषदेत देशाचे भवितव्य ठरेल
परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, यावर्षी भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचे एक दशक पूर्ण होत आहे. आशियान सोबतचे संबंध हे ऍक्ट ईस्ट धोरणाचा आणि इंडो-पॅसिफिक दृष्टिकोनाचा मध्यवर्ती स्तंभ आहेत. तसेच आशियान-भारत शिखर परिषद व्यापक धोरणात्मक भागीदारीद्वारे भारत-आशियान संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. ही परिषद देशासाठी भविष्यातील सहकार्याची दिशा ठरवेल.
लाओ पीपुल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक के प्रधानमंत्री सोनेक्से सिफान्डोन के निमंत्रण पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 10-11 अक्टूबर को लाओ PDR के वियनतियाने का दौरा करेंगे। इस यात्रा के दौरान प्रधानमंत्री 21वें ASEAN-भारत शिखर सम्मेलन और 19वें पूर्वी एशिया शिखर सम्मेलन में भाग लेंगे,… pic.twitter.com/IrBcgnfoFH — ANI_HindiNews (@AHindinews) October 8, 2024
द्विपक्षीय बैठका होणार
या आशियाई-भारत शिखर परिषद आणि पूर्व आशिया शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विपक्षीय बैठका घेणाची शक्यता आहे. या परिषदेत एका प्रमुख नेत्याच्या नेतृत्त्वाखाली धोरणात्मक आत्मविश्वासाचे वातावर निर्माण करण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करणार आहेत. ही परिषद भारतासह EAS सहभागी देशांच्या नेत्यांना प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्याची संधी प्रदान करते.
व्हिएंटियान ही दक्षिणपूर्व आशियातील लाओस देशाची राजधानी आहे. हे लाओस येथील सर्वात मोठे शहर आहे. जे देशाच्या वायव्य भागात मेकाँग नदीच्या काठावर वसलेले आहे. हे ठिकाण थायलंडसह लाओसची आंतरराष्ट्रीय सीमा देखील निर्धारित करते. व्हिएंटियान हे नाव पाली बौद्ध भाषेतील साहित्यिक अभिव्यक्तीवरून आले आहे. म्हणजे राजाच्या चंदनाच्या जंगलांचे शहर. भारतीय धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेले हे मौल्यवान वृक्ष त्याच्या सुगंधासाठी ओळखले जाते.