फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: वर्ष 2024 मधील नोबेल पारितोषिक वितरणाला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत सोमवारी फिजीओलॉजी आणि वैद्यकिय क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त संशोधकांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल जाहीर करण्यात आला आहे. मायक्रोआरएनए च्या शोधासाठी त्यांना हा बहुमान मिळाला आहे. 2024 चा पुरस्कार हा शरीरशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रीतील 115 वां पुरस्कार आहे.
नोबेल पुरस्कार का देण्यात आला?
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना शरीरातील वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी कशा विकसित होतात यामध्ये रस होता. त्यांनी जीन क्रियाकालप नियंत्रण करणाऱ्या मूलभूत तत्त्वांचा शोध लावला. यामुळे त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन्ही शास्त्राज्ञांनी Micro RNA चा शोध लावला. जे आपल्या शरिरात महत्तावाची भूमिका बजावतात. अवयवांच्या विकासाचा हा शोध अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.
This year’s medicine laureates Victor Ambros and Gary Ruvkun studied a relatively unassuming 1 mm long roundworm, C. elegans.
Despite its small size, C. elegans possesses many specialised cell types such as nerve and muscle cells also found in larger, more complex animals,… pic.twitter.com/sUN7HxbzhA
— The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2024
याआधीचे वैद्यकिय क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त
गेल्यावर्षी 2023 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना जाहीर करण्यात आला होता. या शास्त्रज्ञांना न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधांसाठी हा सन्मान देण्यात आला होता. या शोधामुळे कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित करण्यात मदत मिळाली होती. ज्यामुळे हा शोध महामारीच्या काळात अनेक लोकांच्या जीवन वाचवल्याने महत्त्वपूर्ण ठरला. तर 2022 मध्ये स्वीडनच्या स्वेन्ते पाबो यांना फिजीओलॉजी आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता. स्वेन्ते पाबो यांना त्यांच्या विलुप्त होमिनिन्स आणि मानवी उत्क्रांती यांच्या अनुवांशिक (जीनोम) संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता.
नोबेल पारितोषिक
नोबेल पारितोषिक 7 ते 14 ऑक्टोबर कालावधीत जाहीर होणार आहेत. आज भौतिशास्त्रातील नोबेल पारिकोषिक जाहीर होईल. तर रशायनशास्त्राती नोबेल पारितोषिक बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे. या पारितोषिकात विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश मुकुट प्रदान केले जाणार आहे. हा पुरस्कार तीन व्यक्तींना देण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही वैद्यकीय क्षेत्रातील पहिले नोबेल पुरस्कार देण्यात आले आहे. तर उर्वरित पाच पुरस्कारांची घोषणा काही दिवसांत केली जाणार आहे.