Proud Moment for Shubhanshu Shukla's Mother, Family Expresse Joy on Axiom Liftoff
Axiom-4 mission Launch : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी २५ जून रोजी एक नवा इतिहास रचला आहे. शुभांशू शुक्ला यांनी नासाच्या Axiom-4 मोहीमेंतर्गत अंतराळात उड्डाण घेतले आहे. नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून या मोहीमेचे प्रक्षेपण करण्यात आले. यासाठी फाल्कन-९ या रॉकेटचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान या मोहीमेवेळी शुक्ला यांना निरोप देताना त्यांची आई भावुक झाल्या आहेत. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. शुभांशू शुक्ला यांच्या उड्डाणवेळी त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले.
शुभांशू शुक्ला यांनी एका ऐतिहासिक मोहमेसाठी अंतराळात उड्डाण घेतले आहे. त्यांनी केवळ देशाचेच नव्हे तर आपल्या कुटुंबीयांचे देखील नाव उंचावले आहेे. अॅक्सिओम- ४ मोहीमेचे उड्डाणाच्या क्षण त्यांच्या कुटुंबीयांसाठी खास करुन त्याच्या आईसाठी अत्यंत भावुक क्षण होता. यावेळी त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले होते. शुभांशू शुक्ल अवकाशात उड्डाण घेत असताना मुलाच्या काळजीपोटी त्यांची आईला रडू कोसळले. सध्या या भावुक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH लखनऊ: भारतीय वायुसेना के ग्रुप कैप्टन और अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्ला की मां आशा शुक्ला अपने बेटे के लिए खुशी से भावुक हो गईं, जो #AxiomMission4 का हिस्सा है। pic.twitter.com/s2mSrJtWIt — ANI_HindiNews (@AHindinews) June 25, 2025
या प्रक्षेपणानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातवारण आहे. शुभांशू शुक्ला यांच्या वडिलांनी, ही कामगिरी केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले. त्यांच्या कुटुंबातील लोकांनी आनंद व्यक्त केला. तसेच त्यांचे आशीर्वाद शुभांशू शुक्ला यांच्यासोबत असल्याचे म्हटले.
ही मोहीम भारताच्या अंतराळातील वाढती ताकद आणि सहकार्याचे प्रतीक आहे. ही मोहीम १४ दिवसांची असणार आहे. यावेळी शुभांशू शुक्ला भारतीय संस्कृतीचे सादरणीकरण अंतराळात करणार आहे. या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीर नासाच्या अंतराळवीर आणि Ax-4 मोहिमेच्या प्रमुख पेगी व्हिटसन, तसेच पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर काबू सहभागी झाले आहेत.
ही मोहीम १४ दिवसांची असणार आहे. यांतर्गत चारही अंतराळवीर १४ दिवस अंतराळात राहून विविध वैज्ञानिक, जैववैज्ञानिक आणि अभियांत्रिक प्रयोग करणार आहेत. या मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्ला अंतराळात भारतीय संस्कृतीच्या विविध कलाकृतींचे आणि योगासनांचे सादरीकरण करणार आहेत.