कोण आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी? न्यूयॉर्कच्या महापौर डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये मिळवला विजय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या २०२५च्या मेयरपदासाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी जोरदार लढत सुरु आहे. यामध्ये प्रथमच भारतीय वंशांचे आणि मुस्लिम समाजातील जहरान ममदानी उमेदवारपदी उभे राहिले आहेत. दरम्यान मंगळवारी (२४ जून) रात्री न्यू यॉर्कच्या महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये ममदानींना मोठा विजय मिळला आहे. यामुळे त्यांची महापौर बनण्याची शक्यता अधिक वाढली आहे. ममदानींनी प्रसिस्पर्धी आणि माजी गव्हर्नर ॲंड्र्यू कुओमो यांचा पराभव केला आहे.
या मोठ्या विजयानंतर त्यांनी समर्थकांना संबोधित करताना, आपण इतिहास रचला असल्याचे म्हटले. यावेळी कुओमोने देखील पराभव स्वीकारला आणि आज आमचा दिवस नव्हता असते म्हटले. तसेच त्यांनी ममदानीला फोन करुन त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले.
न्यूयॉर्क सिटी बोऱ्ड ऑफ इलेक्शनच्या निकालांनुसार, जोहरान ममदानींना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. हजारो मतदारांनी त्यांना उमेदवार म्हणून पसंती दर्शवली आहे. सध्या अंतिम निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु ममदानी यांची स्थिती मजबूत असल्याचे म्हटले जात आहे. ममदानी महापौर पदी निवडून आल्यास ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय अमेकिन महापौर ठरतील.
ममदानी हे ३३ वर्षांच आहेत सध्या ते न्यूयॉर्क राज्य विनाधसेचे सदस्य आहे. यापूर्वी त्यांनी क्वीन्स जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. त्यांची आई मीरा नायर प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांचे वडिल हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ममदानी यांचा जन्म युगांडाच्या कंपालामध्ये झाला आहे. वयाच्या सातव्या वर्षी ते न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरित झाले. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कचे नागरिकत्व मिळाले. ममदानी यांनी त्यांच्या कॉलेजच्या पॅलस्टाईनमधील स्टुडंट्स फॉर या संस्थेची स्थापना केली आहे. यातूनच त्यांना राजकारणात प्रवेश केला.
ममदानी, न्ययूॉर्क शहरातील विद्यमान महापौर ॲंड्र्यू कुओमा यांना पराभूत कण्यासाछी उमेदवारीपदी उभे राहिले आहेत. त्यांनी प्रचारादरम्यान अतिशय प्रगतशील आश्वासने दिली आहे. यामध्ये मोफत चाइल्ड केअर, मोफत बस सेवा, भाडेधारकांसाठी स्थिर भाडे, स्वस्त गृहनिर्माण आणि श्रीमंतांवर अधिर कर यांचा समावेश आहे. ममदानी यांनी यापूर्वी एक पायलट प्रकल्पाचे नेतृत्व केले होते.
जोहरान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक मानले जातता. त्यांनी २००२ च्या गुजरातच्या दंगलीवर मोदींविरोधात तीव्र टीका केली होती. तसेच त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि नरेंद्र मोदी यांची देखील तुलना केली होती. एकदा १५ मे रीज एका कार्यक्रमादरम्यान ममदानींनी गुजराती मुस्लिम असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरुन मोठा गोंधळ उडाला होता. त्यांच्या या विधानावरुन अनेकांकडून तीव्र टीका करण्यात आला. न्यूयॉर्कमध्येही ममदानी यांच्या विरोधी तीव्र टिका होत आहे.