पुतिन यांचे रशियाला हॉपरसॉनिक मिसाइल उत्पादन करण्याचे आदेश; युक्रेनचे आंतरराष्ट्रीय समुदायाकडे कठोर कारवाईचे आवाहन
मॉस्को: रशिया-युक्रेन युद्धाने आता नवीन वळण घेतले आहे. युक्रेनच्या हल्ल्यांनतर रशिया संतप्त झाली आहे. रशिया देखील युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मोठ्या प्रमाणावर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या एक दिवसानंर दिले आहेत. याशिवाय पुतिन यांनी स्पष्ट केले आहे की,मास्को हायपरसॉनिक ओरोश्निक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या आणखी चाचण्या घेणार आहे.
आम्ही लढाऊ परिस्थितींसह या चाचण्या सुरू ठेवू
रशिया एकीकडे युद्ध सुरू असले तरी क्षेपणास्त्र चाचण्या सुरूच ठेवणार आहे. पुतिन यांनी म्हटले आहे की, “रशियाला सुरक्षा धोक्याची परिस्थिती आणि स्वरूप यावर अवलंबून, आम्ही लढाऊ परिस्थितींसह या चाचण्या सुरू ठेवू,” तसेच त्यांनी लष्करी प्रमुखांच्या बोठकीत हा निर्णय स्पष्ट केला आहे.रशियाने आत्तापर्यंतच्या संघर्षात शस्त्रास्त्रांच्या तैनातीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यास सुरूवात केली आहे. रशियाने काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या डनिप्रो येथे नवीन क्षेपणास्त्रे डागली होती.
पुतिन यांच्या आदेशानंतर काही काळातच क्रेमलिनच्या प्रमुखाने क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू केली. या चाचणीमध्ये 10 पट वेगाने उडणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. तसेच यांसाख्या क्षेपणास्त्रांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास सुरूवात झाली असून असे म्हटले जात आहे की, रशिया एक समान प्रगत प्रणाली विकसित करत आहे. या सर्व क्षेपणास्त्रांचे उत्पादन रशिया प्रचंड करणार असून युक्रेनच्या चिंतेत वाढ झाली आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इतर कोणत्याही देशाकडे असे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नाही
क्रेमिनलच्या प्रमुखांनी सांगितले की, ज्या क्षेपणास्त्रांची चाचमी करण्यात आली के रशियाच्या सुरक्षेसाठी उत्तम आहेत. तसेच ही क्षेपणास्त्रे जगात कोणत्याही देशाकडे नाही. असा दावा पुतिन यांनी केला आहे. त्यांनी मम्हटले आहे की, इतर राज्ये याचा विकास करतीलच पण त्याला एक-दोन वर्षांचा कालावधी लागले. मात्र रशियाकडे ही प्रणाली आदीच उपलब्ध आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने दोन दिवसांपूर्वी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांत रशियन क्षेपणास्त्राचा वेग ताशी 13,000 किलोमीटर होता. या क्षेपणास्त्राने लक्ष्य गाठण्यासाठी फक्त 15 मिनिटे घेतली. तसेच युक्रेनने रशियावर केलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या तैनातीमुळे युद्ध वाढण्याची भीती अधिक गडद झाली आहे.
रशियाचा हापरसॉनिक क्षेपणास्त्रांचा युक्रेनवर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने 21 नोव्हेंबर 2024 रोजी युक्रेनियन शहर डनिप्रोवर आपले नवीन हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘ओराश्निक’ (हेझेल ट्री) सोडले. या हल्ल्याकडे केवळ रशियाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन नव्हे तर पाश्चात्य देशांना कडक इशारा म्हणूनही पाहिले जात आहे.
या हल्ल्यांमुळे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कठोर कारवाई आणि समर्थनाचे आवाहन केले आहे. युक्रेनने रशियाला पाश्चिमात्य क्षेपणास्त्रांद्वारे प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी रशियाने आपल्या लष्करी पावले मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले असून, भविष्यात असे आणखी हल्ले केले जाऊ शकतात, असे संकेत पुतिन यांनी दिले आहेत.