
us military aircraft deployment uk raf fairford trump next target russia tanker 2026
US military planes in UK bases 2026 : अवघ्या काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपले लक्ष युरोप आणि उत्तर अटलांटिक क्षेत्राकडे वळवले आहे. ब्रिटनमधील ग्लॉस्टरशायर आणि सफोक येथील लष्करी तळांवर डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने उतरल्याने संपूर्ण युरोपमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ही केवळ सरावाची प्रक्रिया आहे की एखाद्या मोठ्या युद्धाची नांदी, यावरून जागतिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या ‘रॉयल एअर फोर्स’ (RAF) फेअरफोर्ड तळावर किमान १४ C-17 Globemaster III ही अवाढव्य विमाने दाखल झाली आहेत. ही विमाने जड शस्त्रे आणि लष्करी टँक वाहून नेण्यास सक्षम आहेत. त्याहूनही भयानक म्हणजे, तिथे दोन AC-130J ‘Ghostrider’ गनशिप्स सुद्धा पाहिल्या गेल्या आहेत. या विमानाला ‘उडता किल्ला’ म्हटले जाते, कारण यात १०५ मिमीच्या तोफा आणि अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात असतात. जमिनीवरील किंवा समुद्रातील लक्ष्याला सेकंदात उद्ध्वस्त करण्याची क्षमता या विमानात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन
या लष्करी हालचालींचे मुख्य कारण म्हणजे ‘मॅरिनेरा’ (Marinera) नावाचा एक तेलवाहू टँकर. हा टँकर पूर्वी ‘बेला-१’ नावाने ओळखला जात होता आणि तो अमेरिकन नौदलाच्या नाकेबंदीतून निसटून रशियाच्या दिशेने जात आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, हा टँकर इराण आणि हिजबुल्लाह यांच्याशी संबंधित असून तो बेकायदेशीर निधी पुरवतोय. ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हिली यांनी स्पष्ट केले की, या टँकरला रोखण्यासाठी ब्रिटन अमेरिकेला सर्वतोपरी मदत करत असून, गरज पडल्यास अमेरिकन ‘स्पेशल फोर्सेस’ हेलिकॉप्टरद्वारे या जहाजावर ताबा मिळवू शकतात.
The US is preparing for future military operations: America has moved military aircraft and helicopters to Britain, – The Times It is reported that their relocation followed the capture of Maduro and his wife. This allows the US to prepare for further special operations. A… pic.twitter.com/ivG3q1L4QW — Jürgen Nauditt 🇩🇪🇺🇦 (@jurgen_nauditt) January 7, 2026
credit : social media and Twitter
या मोहिमेत अमेरिकेचे सर्वात खतरनाक हेलिकॉप्टर पथक ‘१६० वी स्पेशल ऑपरेशन्स एव्हिएशन रेजिमेंट’ (Night Stalkers) सहभागी आहे. याच पथकाने ओसामा बिन लादेन आणि अलीकडेच निकोलस मादुरो यांच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिटनमध्ये पोहोचलेल्या विमानांमध्ये ५ MH-60M Black Hawk आणि १ MH-47G Chinook हेलिकॉप्टर देखील आहेत, जे सहसा रात्रीच्या वेळी अत्यंत गुप्त मोहिमा पार पाडण्यासाठी वापरले जातात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video: ‘जर भारत आणि तालिबानला मजा आली नाही तर पैसे परत’; पाकिस्तान लष्कर प्रमुखाला ‘फिल्मीगिरी’ नडली, जगभरात बनले हसे
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच इराण, कोलंबिया आणि अगदी डेन्मार्कच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, जे देश अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला किंवा व्यापाराला धोका निर्माण करतील, त्यांच्यावर लष्करी कारवाई केली जाईल. ब्रिटनमध्ये झालेली ही तैनाती केवळ एक टँकर पकडण्यापुरती मर्यादित नसून, रशिया आणि इराणला दिलेला हा एक मोठा इशारा असल्याचे मानले जात आहे.
Ans: मुख्यत्वे उत्तर अटलांटिकमध्ये सॅंक्शन्स (निर्बंध) तोडून जाणाऱ्या 'मॅरिनेरा' या रशियन ध्वजाखालील तेल टँकरला रोखण्यासाठी आणि विशेष मोहिमांच्या सरावासाठी ही विमाने तिथे आली आहेत.
Ans: हे जगातील सर्वात घातक गनशिप आहे, ज्यामध्ये ३० मिमी आणि १०५ मिमीच्या तोफा असतात. हे जमिनीवरील लक्ष्यावर अत्यंत अचूक गोळीबार करण्यासाठी ओळखले जाते.
Ans: होय, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने (MoD) मान्य केले आहे की त्यांनी अमेरिकेला तळांचा वापर करण्याची परवानगी दिली असून आरएएफ (RAF) देखरेखीसाठी मदत करत आहे.