Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिटनमध्ये मंदी जाहीर; ऋषी सुनक सरकारतर्फे घोषणा

एकेकाळी जगावर अधिराज्य गाजविणारा ब्रिटन देश आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. येत्या काही दिवसांत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. ब्रिटीश सरकार या मंदीचा मारा झेलण्यासाठी प्रयत्न करत आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 18, 2022 | 04:22 PM
ब्रिटनमध्ये मंदी जाहीर; ऋषी सुनक सरकारतर्फे घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

एकेकाळी जगावर अधिराज्य गाजविणारा ब्रिटन देश आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. येत्या काही दिवसांत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. ब्रिटीश सरकार या मंदीचा मारा झेलण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंदीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पावले उचलणार असल्याची घोषणा केली आहे. सुनक यांच्या सरकारने ५५०० कोटी पौंडची आर्थिक योजना सादर केली आहे.

गुरुवारीच अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सरकारचा आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये करांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. ऊर्जा कंपन्यांवरील विंडफॉल टॅक्स २५ टक्क्यांवरून ३५ टक्के करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक जनरेटरवर ४५ टक्के तात्पुरता कर लावण्यात आला आहे. आता वार्षिक १.२५ लाख पौंड कमावणारे लोकही सर्वोच्च कराच्या कक्षेत येतील. तसेच २०२५ पासून इलेक्ट्रिक वाहनांवर उत्पादन शुल्क लावले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

जेरेमी हंट यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ऑटम स्टेटमेंट सादर केले. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी यास पाठिंबा दिला. ब्रिटनमधील महागाई आटोक्यात येत नाहीय. त्यामुळे सरकारने कराचे दर वाढवले ​​आहेत. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मिनी बजेटमुळे ब्रिटीश सरकारला धक्का बसला होता. त्यातून सावरण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे.. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे इंधनासह अन्य वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. २०२४ पर्यंत अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

संपूर्ण जग ऊर्जा आणि महागाईच्या संकटाचा सामना करत आहे. स्थैर्य, विकास आणि सार्वजनिक सेवा या योजनेमुळे आपण मंदीचा सामना करू शकू, असे हंट म्हणाले. ब्रिटनमध्ये वाढत्या महागाईमुळे सरकारसह सर्वसामान्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. ब्रिटनमधील महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात ११.१ टक्क्यांवर पोहोचला असून, ४१ वर्षांचा विक्रम मोडला आहे. १९८१ नंतरचा हा सर्वाधिक महागाई दर आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर १०.१ टक्के होता.

Web Title: Recession announced in britain by rishi sunak government nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 04:22 PM

Topics:  

  • britain
  • Rishi Sunak
  • world

संबंधित बातम्या

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी
1

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी

UK-France agreement : ब्रिटनची मोठी कारवाई; फ्रान्समधून हद्दपार झालेला पहिला व्यक्ती ठरला ‘एक भारतीय नागरीक’
2

UK-France agreement : ब्रिटनची मोठी कारवाई; फ्रान्समधून हद्दपार झालेला पहिला व्यक्ती ठरला ‘एक भारतीय नागरीक’

Anti Immigration Protest UK : कोण आहे टॉमी रॉबिन्सन? ज्याच्या एका आवाजावर लाखो लोक उतरले लंडनच्या रस्त्यावर
3

Anti Immigration Protest UK : कोण आहे टॉमी रॉबिन्सन? ज्याच्या एका आवाजावर लाखो लोक उतरले लंडनच्या रस्त्यावर

London far-right protest : ‘लढा नाहीतर मरा… ‘, अमेरिकेत बसून लंडनमध्ये निदर्शने का भडकावत आहेत एलोन मस्क?
4

London far-right protest : ‘लढा नाहीतर मरा… ‘, अमेरिकेत बसून लंडनमध्ये निदर्शने का भडकावत आहेत एलोन मस्क?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.