Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rini Sampath: तामिळनाडूची लेक अमेरिकेत गाजवणार मैदान! रिनी संपत महापौरपदाच्या शर्यतीत; लोकांच्या नजरा खिळल्या निवडणुकीवर

DC Mayor 2026 : भारतीय वंशाच्या रिनी संपत वॉशिंग्टन डीसीच्या महापौरपदासाठी निवडणूक लढवत आहेत. ३१ वर्षीय रिनी या प्राथमिक मतपत्रिकेवर नाव आलेल्या पहिल्या दक्षिण आशियाई उमेदवार ठरल्या आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 05, 2026 | 12:40 PM
rini sampath indian origin woman running for washington dc mayor election 2026 history

rini sampath indian origin woman running for washington dc mayor election 2026 history

Follow Us
Follow Us:
  • तामिळनाडू ते वॉशिंग्टन डीसी
  • ऐतिहासिक उमेदवारी
  • ‘फिक्स द बेसिक्स’ व्हिजन

Rini Sampath Washington DC Mayor candidate : अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाच्या व्यक्तींचा बोलबाला सातत्याने वाढत आहे. आता या यादीत आणखी एक मानाचे नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे रिनी संपत (Rini Sampath). अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसी (Washington D.C.) मध्ये सध्या महापौरपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि या निवडणुकीत रिनी संपत यांनी आपली उमेदवारी जाहीर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या एका मुलीने आज जगातील सर्वात शक्तिशाली शहराच्या सर्वोच्च पदासाठी दावा ठोकला आहे, ही बाब संपूर्ण भारतासाठी गौरवास्पद आहे.

तामिळनाडू ते अमेरिकेचा प्रवास

रिनी संपत यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या रिनी अवघ्या ७ वर्षांच्या असताना आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. गेल्या १० वर्षांहून अधिक काळ त्या वॉशिंग्टन डीसीमध्ये वास्तव्यास आहेत. ३१ वर्षांच्या रिनी यांनी एक ‘सरकारी कंत्राटदार’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र, केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने राजकारणात पाऊल ठेवले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या रिनी यांच्याकडे तरुण आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bahrain Bapco: इराणने बहरीनमध्ये घातला धुमाकूळ! ‘घातक’ हल्ल्यामुळे तेल उत्पादन ठप्प, कुवेतमध्ये अंधार; पाहा धक्कादायक VIDEO

‘मी राजकारणी नाही, मी बदल घडवणारी व्यक्ती आहे!’

रिनी संपत यांनी आपल्या प्रचाराची धुरा अत्यंत साध्या पण प्रभावी मुद्द्यांवर ठेवली आहे. त्यांनी ‘फिक्स द बेसिक्स’ (Fix the Basics) ही संकल्पना मांडली आहे. आपल्या वेबसाइटवर त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “मी प्रस्थापित राजकारणी नाही आणि कोणत्याही मोठ्या हितसंबंधी गटाच्या दबावाखाली नाही. आता वेळ आली आहे की एका सामान्य व्यक्तीने पुढे येऊन शहराच्या मूलभूत सोयीसुविधांकडे लक्ष द्यावे.” रस्ते, पाणी आणि सुरक्षा यांसारख्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला आहे.

Rini Sampath, a Tamil Nadu-born candidate, has become the first South Asian person to secure a place on the ballot of Washington DC’s Mayoral elections.https://t.co/uICJHx40Qj — Firstpost (@firstpost) April 4, 2026

credit – social media and Twitter

विजयासाठी काय आहे रिनी यांची ‘महायोजना’?

रिनी संपत यांच्या विजयाचा मार्ग हा ‘लोकशक्ती’ (People Power) वर आधारित आहे. केवळ चार आठवड्यांच्या मोहिमेत त्यांनी मतपत्रिकेवर आपले नाव आणून दाखवले, जे यापूर्वी कोणत्याही दक्षिण आशियाई उमेदवाराला जमले नव्हते. त्यांच्या योजनेत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत:

  • ९११ प्रतिसाद वेळ: आपत्कालीन परिस्थितीत ९११ वर कॉल केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद वेळ कमी करणे.
  • पायाभूत सुविधा: रस्त्यांवरील खड्डे भरणे आणि पोटोमॅक नदीतील सांडपाण्याची समस्या कायमची निकाली लावणे.
  • किमतींवर नियंत्रण: वाढत्या महागाईपासून रहिवाशांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करणे.
  • मतदारांपर्यंत पोहोच: मर्यादित संसाधने असूनही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे ध्येय आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Pilot Rescue : इराणच्या जबड्यातून वैमानिकाची सुटका! अमेरिकेचा थरारक ‘रेस्क्यू मिशन’; ट्रम्प यांचा शत्रूला सज्जड दम

डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला आणि रिनी यांची संधी

वॉशिंग्टन डीसी हा १९७५ पासून डेमोक्रॅटिक पक्षाचा अभेद्य गड राहिला आहे. आजवर इथे कोणताही रिपब्लिकन महापौर निवडून आलेला नाही. अशा परिस्थितीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत रिनी संपत यांनी मारलेली मजल अत्यंत महत्त्वाची आहे. जर रिनी ही निवडणूक जिंकल्या, तर त्या वॉशिंग्टन डीसीच्या पहिल्या दक्षिण आशियाई महापौर बनून इतिहास रचतील. तामिळनाडूच्या या कन्येचा विजय हा केवळ त्यांचा वैयक्तिक विजय नसून, तो अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या वाढत्या प्रभावाचा पुरावा असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रिनी संपत कोण आहेत आणि त्या कोणत्या पदासाठी निवडणूक लढवत आहेत?

    Ans: रिनी संपत या भारतीय वंशाच्या (तामिळनाडू) महिला असून त्या अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी शहराच्या महापौरपदासाठी निवडणूक लढवत आहेत.

  • Que: रिनी संपत यांच्या निवडणूक प्रचाराचे मुख्य सूत्र काय आहे?

    Ans: रिनी यांच्या प्रचाराचे मुख्य सूत्र 'फिक्स द बेसिक्स' (मूलभूत गोष्टी सुधारा) हे असून त्या शहराच्या पायाभूत सुविधांवर भर देत आहेत.

  • Que: रिनी संपत यांनी कोणता ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे?

    Ans: वॉशिंग्टन डीसीच्या इतिहासात महापौरपदाच्या प्राथमिक मतपत्रिकेवर नाव येणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई उमेदवार ठरल्या आहेत.

Web Title: Rini sampath indian origin woman running for washington dc mayor election 2026 history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • America
  • washington news
  • World news

संबंधित बातम्या

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?
1

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

Mossad : ‘पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला संपवणार होती इस्रायली मोसाद…’ ब्राझीलच्या पत्रकाराचा स्फोटक खुलासा
2

Mossad : ‘पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला संपवणार होती इस्रायली मोसाद…’ ब्राझीलच्या पत्रकाराचा स्फोटक खुलासा

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…
3

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…

Venezuela Earthquake : अखेर मृतांचा आकडा समोर! आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा भूकंपात मृत्यू, तर शेकडोहून अधिक जखमी
4

Venezuela Earthquake : अखेर मृतांचा आकडा समोर! आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा भूकंपात मृत्यू, तर शेकडोहून अधिक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.