Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाचे कीववर सातत्याने ड्रोनने हल्ले सुरूच; झेलेन्स्की संतापले म्हणाले- याचे चोख प्रत्युत्तर मिळेल

Russia Ukraine War: सध्या रशिया-युक्रेन युद्ध अधिक आक्रमक होत चालले आहे. हे युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने सलग दोन दिवस युक्रेनवर हल्ले केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 21, 2024 | 04:43 PM
रशियाचे कीववर सातत्याने ड्रोनने हल्ले सुरूच

रशियाचे कीववर सातत्याने ड्रोनने हल्ले सुरूच

Follow Us
Close
Follow Us:

कीव: सध्या रशिया-युक्रेन युद्ध अधिक आक्रमक होत चालले आहे. हे युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने सलग दोन दिवस युक्रेनवर हल्ले केले आहेत. तसेच युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमुळे निवासी इमारतींचे नुकसान झाले. रशियाने केलेल्या या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी संताप व्यक्त केला आहे.

ड्रोन नष्ट केले

रशिया सातत्याने कीववर हल्ले करत आहे. त्यामुळे युक्रेनची चिंता वाढली आहे. तसेच कीवचे लष्करी प्रशासन प्रमुख सेर्ही पोप्को यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर सांगितले आहे की, रशियाने सुमारे 10 ड्रोनने शहरावर हल्ला केला होता मात्र युक्रेनने ते वेगवेगळ्या दिशांनी ते नष्ट केले होते. ते म्हणाले की कोणत्याही ड्रोनने आपल्या लक्ष्याला धडक दिली नाही. दरम्यान, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशाच्या पश्चिम भागात 100 हून अधिक युक्रेनियन ड्रोन पाडले. तसेच रशियाच्या सात भागांकडे पाठवलेले 110 ड्रोन काल रात्री पाडण्यात आले आहेत. मंत्रालयाने म्हटले की, अनेक ड्रोन कुर्क्सच्या रशियन सीमावर्ती भागाला लक्ष्य करत आहेत.

हे देखील वाचा- याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर इस्रायलचा गाझामध्ये कहर; हमास लष्कराच्या निशाण्यावर

झेलेन्स्की रशियावर संतापले

रशियाच्या या हल्ल्यांमुळे युक्रेनचे अध्यक्ष वॉल्डेमिर झेलेन्स्की संतापले आहेत. त्यांनी म्हटले की, रशियाने गेल्या आठवड्यात युक्रेनवर सुमारे 800 हवाई बॉम्ब आणि 500 ​​हून अधिक हल्ला ड्रोन सोडले आहेत. तसेच रशिया दररोज आमच्या शहरांवर आणि समुदायांवर हल्ला करत आहे, शत्रूने आपल्या लोकांविरुद्ध जाणूनबुजून केलेले हे दहशतवादाचे कृत्य असल्याचे म्हटेल आहेत. तसेच या हल्ल्यांचे चोख प्रत्युत्तर मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिका मदत करत आहे

तर, अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कीवला $425 दशलक्ष शस्त्रास्त्र पॅकेज मदत पाठवली आहे. पॅकेजमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, चिलखती वाहने आणि इतर शस्त्रे यांचा समावेश आहे. बायडेन नोव्हेंबरमध्ये युक्रेनच्या मित्रपक्षांची आभासी बैठक देखील घेणार आहेत. या घटनांमुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे.  दरम्यान, रशियानेही अणुशक्तीचा पुन्हा एकदा उल्लेख करून पश्चिमेकडील देशांना युक्रेनला मदत करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाने आपल्या स्ट्रॅटेजिक न्यूक्लियर फोर्सेसच्या क्षेपणास्त्र युनिटच्या तयारीची चाचणी केली आहे.

हे देखील वाचा- ‘UNSC’ मध्ये भारताला सदस्यत्व हवे; रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी व्यक्त केली भूमिका

Web Title: Russia ukraine war russia continues to attack kyiv with drones nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 04:43 PM

Topics:  

  • Russia
  • ukraine

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
2

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
3

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
4

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.