फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मॉस्को: रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारत, ब्राझील आणि आफ्रिकन देशांच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाचा मुद्दा पुन्हा उचलला आहे. लावरोव यांनी नमूद केले आहे की, जगातील विविधतेचे प्रतिनिधित्व करणे महत्त्वाचे आहे आणि जागतिक संघटनेत प्रादेशिक दृष्टिकोनातून महत्त्व असलेल्या देशांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सुरक्षा परिषदेत भारतासारख्या महत्त्वाच्या देशांना कायमस्वरूपी सदस्य म्हणून समावेश करण्याची गरज असल्याचे लावरोव यांनी म्हटले आहे.
भारत, ब्राझील आणि आफ्रिकन देश सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठी पात्र आहेत
मिळालेल्या माहितीनिसरा, रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांनी एका मीडियाशी संवाद साधताना हे स्पष्ट केले आहे. त्यांनी भारत, ब्राझील आणि आफ्रिकन देश दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठी पात्र असल्याचे म्हटले आहे. त्यांचे प्रतिनिधित्व कायमस्वरूपी असणे ही जागतिक बहुसंख्यांचे योग्य प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक बाब आहे. विशेषतः ग्लोबल साउथचा आवाज अधिक ठळक करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल, असेही लावरोव यांनी म्हटले.
चीनच्या विरोधामुळे भारताला UNSC मध्ये जागा मिळाली नाही
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील पाच कायमस्वरूपी सदस्यांमध्ये चीन, रशिया, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. भारताला कायम सदस्यत्व देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांनीही लावरोव यांना आदीच समर्थन दिले होते. मात्र चीनने याला विरोध केला आहे. चीनने यामध्ये अडथळे निर्माण केल्याने भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आत्तापर्यंत जागा मिळाली नाही. सध्या, 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेतील 10 सदस्य अस्थायी असून 5 सदस्य कायमस्वरूपी आहेत.
रशियाने भारताच्या बाजूने आवाज उठवला
मीडिया रिपोर्टनुसार, 2021-22 मध्ये भारताने अस्थायी सदस्य म्हणून सुरक्षा परिषदेवर काम केले होते. त्या काळातही भारताने UNSC मध्ये सुधारणा आणि कायमस्वरूपी जागांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. यामुळे रशियाने जागतिक स्तरावर दक्षिणेचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी भारताच्या बाजूने आवाज उठवला आहे. लावरोव यांनी असेही सांगितले आहे की, न्याय जागतिक व्यवस्थेसाठी सुरक्षा परिषदेत भारताचे आणि इतर प्रमुख देशांचे प्रतिनिधित्व वाढविणे अत्यावश्यक आहे, ज्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक स्थिरता सुनिश्चित होईल.
हे देखील वाचा- अमेरिका आणि कॅनडाने मिळून चीनचा ताण वाढवला; संवेदनशील भागात युद्धनौका दाखल