Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेलेन्स्कींना मोठा झटका! कीवमध्ये युक्रेनियन सुरक्षा सेवेच्या कर्नलची हत्या; रशिया सामील असल्याचा संशय

सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध अधिक तीव्र होत चालले आहे. रशिया युक्रेनवर एकामागून एक हल्ले करत आहे. दोन दिवसांपूर्वीचे रशियाने युक्रेनच्या पश्चिम भागांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2025 | 05:47 PM
Russia Ukraine War : Ukrainian Security Service colonel shot dead in Kyiv

Russia Ukraine War : Ukrainian Security Service colonel shot dead in Kyiv

Follow Us
Follow Us:

Russia Ukraine War : कीव : सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध अधिक तीव्र होत चालले आहे. रशिया युक्रेनवर एकामागून एक हल्ले करत आहे. दोन दिवसांपूर्वीचे रशियाने युक्रेनच्या पश्चिम भागांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामुळे युक्रेनचे प्रचंड नुकसान सुरु झाले होते. दरम्यान युक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या कर्नलची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून यामध्ये रशियाचा हात असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. या घटनेने युक्रेनमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.

युक्रेनच्या आरबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या होलोसिएव्हस्की जिल्ह्यात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात क्रेनच्या सुरक्षा सेवेच्या कर्नलची हत्या करण्यात आली आहे. हा हल्ला रशियाने केला असल्याचे मानले जात आहे, परंतु अद्याप रशियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पुतिन अमेरिकेसमोर होणार नतमस्तक? गेल्या २४ तासांत ट्रम्प यांनी घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णय

घटनेचा तपास सुरु

युक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या कर्नलची गोळी झाडून हत्या झाल्याची पुष्टी युक्रेनने केली आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असल्याचे युक्रेनच्या पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सध्या परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी चौकशी सुरु आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

इस्रायलप्रमाणे टारगेट किलिंगच्या पद्धतीचा वापर करत आहे रशिया?

इराणशी युद्धादरम्यान इस्रायलने टारगेट किलिंग पद्धतीचा वापर केला होता. इस्रायलने इराणच्या अधिकाऱ्यांना एक-एक करुन ठार केले होते. दरम्यान रशिया देखील याच पद्धतीचा वापर करत असल्याचे मानले जात आहे. शिवाय यापूर्वी देखील रशियाने असेच युक्रेनच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचा खात्मा केला होता.

युक्रेनच्या लष्कर आण गुप्तचर अधिकाऱ्यांवर रशियाने ड्रोन आणि कार बॉम्बने लक्ष्य केले होते. २०२३ मध्ये युक्रेनच्या गुप्तचर प्रमुख किरिलो बुडानोव्ह यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्यांचा जीव थोडक्यात बचावला. रशियाने यामध्ये क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. दरम्यान पुन्हा एकदा रशिया हीच पद्धत अवलंबवत असल्याचे म्हटले जात आहे.

रशियाचा कीववर तीव्र हल्ला

सध्या रशिया युक्रेनवर गेल्या काही दिवसांपासून सतत तीव्र हल्ले करत आहे. विशेष करुन युक्रेनची राजधानी कीववर रशियाने तीव्र हल्ले केले आहे. रशियाने काही दिवसांपूर्वीच कीववर सर्वात मोठा हल्ला केला होता. जवळपास ७०० ड्रोन्स रशियाने कीववर डागले होते. तसेच रशियाने युक्रेनच्या पश्चिमी भागातील शहरांनाही लक्ष्य केले आहे. यामध्ये लुत्स्क, ल्विव्ह, खमेलनित्स्की आणि टेर्नोपिल या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाचा कहर! युक्रेनच्या अनेक भागांवर रात्रभर ड्रोन्स अन् क्षेपणास्त्रांचा वर्षाव

Web Title: Russia ukraine war ukrainian security service colonel shot dead in kyiv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.