Russian Forces to enter for take back Kursk region by use gas pipeline
कीव: सध्या रशिया-यूक्रेन युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ही दिसत नाही. दिवसेंदिवस हा संघर्ष तीव्र होत चालला असून रशियन सैन्याने आता कुर्स्क प्रदेशात प्रवेश केला आहे. रशियाने कुर्स्क मध्ये हल्लाबोल करत मोठे आक्रमण केले आहे. रशियाच्या लष्कराने विशेष रणनितीचा वापर करत युक्रेनियन सैन्यावर हल्ला केला आहे. रशियाच्या सैनिकांनी गॅसपाइपलाइनमधून घुसखोरी केली आहे. रशियाच्या कुर्स्कचा काही भाग गेल्या वर्षी यूक्रेन ताब्यात घेतला होता. आता रशिया संपूर्ण क्षेत्रावर परत नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
यूक्रेनची धाडसी घुसखोरी
यूक्रेनने ऑगस्ट 2024 मध्ये रशियाच्या कुर्स्क क्षेत्रावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 1000 किमी पर्यंतचा भाग काबीज करण्यात आला होता. यामुळे हजारो रशियन नागरिकांना घर सोडून पळावे लागले होते. या हल्ल्यादरम्यान यूक्रेनने रशियाच्या अनेक सैनिकांनी बंदी बनवले होते. युक्रेनच्या या हल्ल्यानंतर रशियाने मोठा प्रतिहल्ला सुरु केला. रशियन सैन्याने 50 हजाराहून अधिक सैन्य कुर्स्कच्या भागात तैनात केले आणि यूक्रेनला पळून जाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.
गॅस पाइपलाइनमधून घुसखोरी
यूक्रेनने कुर्स्कमध्ये आपले स्थान मजबूत केले होते. मात्र, रशियन सैन्यांनी नवी रणनिती वापरत या प्रदेशावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा हल्ला सुरु केला आहे. रशियाने 15 किमी लांबीच्या गॅस पाइपलाइनमधून प्रवेश करत यूक्रेनवर आक्रमण केले आहे. काही सैनिकांनी अनेक दिवस पाइपलाइनमध्ये राहून हल्ल्याची तयारी केली होती. रशियन लष्कराने सुदजा शहराजवळील यूक्रेनच्या सैनिकांवर हल्ला केला आहे. सध्या यूक्रेन या भागातील आपले लष्करी सैन्य आणि उपकरणे माघारी घेत आहे.
युद्ध अद्यापही सुरुच
2022 च्या फेब्रुवारी महिन्यात सुरु झालेले यूद्ध अद्याप सुरु आहे. रशियाने आतापर्यंत यूक्रेनच्या 20% क्षेत्रावर ताबा मिळवला आहे. डोनेस्टक, लुहांस्क, जापोरिजिय्या आणि खेरसॉन हे चार यूक्रेनी प्रांक रशियाच्या नियंत्रणाखाली आहेत. रशियाने कुर्स्कवर हल्ला चढवला आहे. मात्र, यूक्रेन सैनिकही याला प्रत्युत्तर देत आहेत. दोन्ही देश या यूद्धातून वाटाघाटी करण्यास तयार आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला यूद्ध अजूनही थांबलेले नाही. सध्या कुर्स्कच्या संघर्षामुळए संपूर्ण युद्ध पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे.
एलॉन मस्कची झेलेन्स्कींना धमकी
दुसरीकडे ट्रम्प आणि झेलेन्स्की वादाच्या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी झेलेन्स्कींना इशार देत म्हटले आह की, “यूक्रेनमधील स्टारलिकं सेवा बंद करण्यात येतील, यामुळे त्यांना मोठ्या आडचणींचा सामना करावा लागले.” यूक्रेनमधील स्टारलिंक सेवा बंद केल्यास यूक्रेनच्या लष्करी संवादावर गंभीर परिणाम होईल. ड्रोन हल्ले आणि सायबर ऑपरेशन्सची क्षमता कमी होईल आणि याचा रशियाला युद्धभूमीत फायदा होईल. यूक्रेनची संपूर्ण लष्करी दळणवळण व्यवस्था ढासळेल.