Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Protests : इराणमध्ये क्रांतीची ठिणगी! सर्वोच नेते खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत; मोसादचा धाडसी खुलासा

Iran Protests : देशभरात निदर्शने वाढत असताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी "प्लॅन बी" तयार केला आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या कुटुंबासह आणि जवळच्या सहकाऱ्यांसह रशियाला पळून जाऊ शकतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 05, 2026 | 02:18 PM
Will Khamenei leave Iran and flee to Russia 95 billion dollars worth of assets and 'Plan B' ready Former Mossad officer also confirms

Will Khamenei leave Iran and flee to Russia 95 billion dollars worth of assets and 'Plan B' ready Former Mossad officer also confirms

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमध्ये वाढता जनक्षोभ आणि अमेरिकेच्या दबावामुळे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी देश सोडण्यासाठी गुप्त ‘प्लॅन बी’ तयार केल्याचा दावा ब्रिटीश माध्यमांनी केला आहे.
  •  खामेनेई आपल्या कुटुंबासह आणि ९५ अब्ज डॉलर्सच्या अफाट संपत्तीच्या जाळ्यासह रशियाला (मॉस्को) पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
  •  सीरियाचे हुकूमशहा बशर अल-असद ज्याप्रमाणे रशियाला पळाले, त्याच धर्तीवर खामेनेई आपली सुटका करून घेण्याची शक्यता मोसादच्या माजी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

Ali Khamenei escape plan Russia 2026 : गेल्या काही आठवड्यांपासून इराणमध्ये महागाई, बेरोजगारी आणि हुकूमशाही राजवटीविरुद्ध सुरू असलेली निदर्शने आता नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांनी आपला देश सोडण्याचा गुप्त आराखडा आखल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ब्रिटीश वृत्तपत्र ‘द टाईम्स’ (The Times) च्या वृत्तानुसार, ८६ वर्षीय खामेनेई यांनी देशात आपली सत्ता कोसळल्यास रशियाला आश्रय घेण्यासाठी ‘प्लॅन बी’ (Plan B) तयार ठेवला आहे.

इराण पेटला! हुकूमशाहीविरुद्ध तरुणाईचा एल्गार

इराणमध्ये सध्या आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रियालची घसरण आणि ४२ टक्क्यांहून अधिक असलेला महागाई दर यामुळे त्रस्त जनता रस्त्यावर उतरली आहे. राजधानी तेहरानसह देशातील २१ राज्यांमध्ये ‘हुकूमशाह मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या जात आहेत. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात अनेक निष्पाप तरुणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, २०२२ च्या ‘महसा अमिनी’ आंदोलनानंतरचे हे सर्वात मोठे जनआंदोलन मानले जात असून, यावेळी आंदोलक थेट सर्वोच्च नेत्याच्या सत्तेला आव्हान देत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trade War: ‘त्यांना मला खूश करायचे होते… ‘PM Modi आणि Trump यांच्यात ‘ऑइल’वरून ठिणगी; USने पुन्हा उगारली Tariff तलवार

काय आहे खामेनेई यांचा ‘प्लॅन बी’?

गुप्तचर अहवालानुसार, खामेनेई यांनी केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठीच नाही, तर आपल्या विशाल आर्थिक साम्राज्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठीही तयारी केली आहे. या योजनेत त्यांचे कुटुंब आणि संभाव्य उत्तराधिकारी मोज्तबा खामेनेई यांच्यासह २० जवळच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, खामेनेई यांची एकूण संपत्ती सुमारे ९५ अब्ज डॉलर्स (सुमारे ८ लाख कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे. ही संपत्ती ‘सेताद’ (Setad) या शक्तिशाली संस्थेच्या माध्यमातून चालवली जाते, ज्यावर खामेनेईंचे थेट नियंत्रण आहे.

#BREAKING Supreme Leader Ali Khamenei has a back-up plan to flee Iran for Moscow with a close circle of up to 20 aides and family should unrest intensify and security forces desert or fail to suppress the protests, The Times reported on Sunday, citing an intelligence report… pic.twitter.com/3Gw16V9p2o — Iran International English (@IranIntl_En) January 4, 2026

credit : social media and Twitter

बशर अल-असदच्या मार्गावर खामेनेई?

इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसाद (Mossad) चे माजी अधिकारी बेनी सबती यांनी या दाव्याला दुजोरा दिला आहे. सबती यांच्या मते, “खामेनेई यांच्यासाठी रशियाशिवाय दुसरा कोणताही सुरक्षित पर्याय उरलेला नाही.” नोव्हेंबर २०२४ मध्ये सीरियाचे हुकूमशहा बशर अल-असद ज्याप्रमाणे आपले सरकार कोसळल्यानंतर मॉस्कोला पळून गेले, त्याच पावलावर पाऊल ठेवून खामेनेई आपली सुटका करून घेण्याची शक्यता आहे. खामेनेई आणि पुतिन यांचे संबंध जुने आहेत आणि रशियन संस्कृतीशी आपली साम्यता असल्याचे खामेनेई यांनी यापूर्वीही म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump 2026 : संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा ट्रम्पचा प्लॅन; अमेरिकेचे ‘जानेवारी कॅलेंडर’ लीक आता ‘या’ 5 देशांवर नजर

ट्रम्प यांची ‘मॅक्सिमम प्रेशर’ रणनीती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या परिस्थितीवर कडक भूमिका घेतली आहे. शांततापूर्ण आंदोलकांवर गोळीबार झाल्यास अमेरिका गप्प बसणार नाही, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून इराणवर लादलेले कठोर निर्बंध आणि लष्करी कारवाईची टांगती तलवार यामुळे खामेनेई यांच्या राजवटीला घरघर लागली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमध्ये सध्या निदर्शनं का होत आहेत?

    Ans: वाढती महागाई (४२% पेक्षा जास्त), बेरोजगारी, पाण्याचे दुर्भिक्ष आणि हुकूमशाही राजवटीच्या विरोधात इराणमधील जनता रस्त्यावर उतरली आहे.

  • Que: अयातुल्ला खामेनेई यांची एकूण संपत्ती किती आहे?

    Ans: विविध अहवाल आणि रॉयटर्सच्या तपासानुसार, खामेनेई यांची एकूण संपत्ती सुमारे ९५ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे.

  • Que: खामेनेई रशियाला का जाऊ इच्छितात?

    Ans: सीरियाचे माजी नेते असद यांच्याप्रमाणेच खामेनेईंना रशिया हा सर्वात सुरक्षित देश वाटतो, कारण त्यांचे पुतिन यांच्याशी चांगले संबंध आहेत.

Web Title: Iran khamenei escape plan russia 95 billion assets mossad confirm 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • International Political news
  • Iran News
  • Iran Protest
  • Russia
  • third world war

संबंधित बातम्या

Iran News : ‘खामेनी सरकारचा अंत लवकरच…’ ; माजी राजकुमार रेझा पहलवींचे खळबळजनक दावा 
1

Iran News : ‘खामेनी सरकारचा अंत लवकरच…’ ; माजी राजकुमार रेझा पहलवींचे खळबळजनक दावा 

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल
2

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल

War Alert: ड्रॅगनला धडकी! आता अमेरिकेने उघडले इतिहासातील ‘ते’ बंद दरवाजे; दुसऱ्या महायुद्धातील धावपट्ट्या पुन्हा होणार गरम
3

War Alert: ड्रॅगनला धडकी! आता अमेरिकेने उघडले इतिहासातील ‘ते’ बंद दरवाजे; दुसऱ्या महायुद्धातील धावपट्ट्या पुन्हा होणार गरम

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड
4

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.