एस. जयशंकर SCO Summit परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात
नवी दिल्ली: 23 वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदत यावेळी पाकिस्तानमध्ये पार पडणार आहे. यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. या दौऱ्याचे महत्त्व विशेष आहे, कारण 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचा असा उच्चस्तरीय दौरा पाकिस्तानामध्ये झाला आहे. याआधी 2015 मध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला भेट दिली होती.
यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा हा दौरा केवळ SCO बैठकीसाठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याची माहिती आहे. परिषदेपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि एस. जयशंकर यांची बैठक होणार आहे. या बैठकीची शिखर परिषदेची औपचारिक सुरुवात होईल असे सांगितले आहे. याशिवाय एस. जयशंकर यांनी नुकतेच एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले होते की भारताला पाकिस्तानशी चांगले संबंध हवेत, मात्र सीमापार दहशतवादाकडे दुर्लक्ष करून हे साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव कायम आहे, आणि द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता नाही.
Landed in Islamabad to take part in SCO Council of Heads of Government Meeting. pic.twitter.com/PQ4IFPZtlp
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 15, 2024
कडक सुरक्षा तैनात
SCO बैठकीच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान संबंधांबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच यावेळी भारत पाकिस्तान आणि इतर शेजारी देशांशी आर्थिक, सुरक्षात्मक आणि व्यापारविषयक सहकार्याचे मुद्द्यांवर देखील चर्चा करणार आहे. या बैठकीत दहशतवाद, सीमावाद, आणि व्यापारातील वाढ यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. इस्लामाबादमध्ये या शिखर परिषदेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाकिस्तानने ठेवली आहे. हॉटेल्स आणि परदेशी शिष्टमंडळांच्या मुक्कामासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
एस. जयशंकर यांचा हा दौरा भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये मोठे बदल घडवणार नाही. मात्र या परिषदेच्या माध्यमातून बहुपक्षीय सहकार्य आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित करत आहे. भारतासाठी हा दौरा SCO मधील आंतरराष्ट्रीय सहभागाचे महत्त्व आणि पाकिस्तानशी कायम ठेवायच्या संवादाची गरज यावर आधारित आहे.