simpsons predictions about donald trump 2025 latest update president health viral news
Donald Trump Death Viral News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेच्या वादळात सापडले आहेत. कारण म्हणजे त्यांच्या मृत्यूबाबत आणि अचानक बेपत्ता होण्याबाबत पसरलेल्या अफवा. विशेष म्हणजे, अमेरिकन लोकप्रिय कार्टून शो ‘द सिम्पसन’ ने ट्रम्प यांच्या निधनाबद्दल केलेल्या भाकिताचा पुन्हा एकदा उल्लेख होत असून, त्यामुळे या चर्चेला अधिक वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दल सतत अटकळ बांधल्या जात होत्या. नुकतेच त्यांच्या हातांवर दुखापतीच्या खुणा दिसल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या आरोग्याविषयी शंका अधिकच गडद झाल्या. त्यातच, ट्रम्प यांनी गेल्या २४ तासांत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न घेतल्याने आणि ३०-३१ ऑगस्टचे कार्यक्रम रद्द झाल्याने चर्चांना नवी हवा मिळाली. याच पार्श्वभूमीवर, ट्रम्प अचानक बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली. या वृत्ताने अमेरिकेत आणि विशेषतः व्हाईट हाऊसच्या गलियार्यात खळबळ उडाली आहे. काही माध्यमांनी आणि सोशल मीडियावरील युजर्सनी “ट्रम्प खरोखरच जिवंत आहेत का?” असा प्रश्न उपस्थित केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पच्या टॅरिफमुळे बदलली जगाची राजनीती… रशिया, चीन आणि भारतानंतर आता ‘हे’ 3 देश करणार महायुती
सोशल मीडियावर अफवांचा पूर उसळला असला तरी ट्रम्प यांनी आपला ट्रुथ सोशल अकाउंट सक्रिय ठेवले आहे. त्यांच्या डॉक्टरांनीदेखील स्पष्ट केले आहे की ट्रम्प यांच्या दुखापती केवळ किरकोळ आहेत. डॉक्टरांच्या मते, हस्तांदोलनामुळे व नियमित घेतल्या जाणार्या औषधांमुळे हातावर लहानशा खुणा पडल्या. यातून कोणताही गंभीर आरोग्यविषयक धोका नाही. म्हणजेच, त्यांच्या मृत्यूबाबत पसरवलेल्या अफवा वास्तवापासून पूर्णपणे दूर आहेत. तरीसुद्धा, ट्रम्प यांच्या अचानक सार्वजनिक आयुष्यातून गायब होण्याने आणि काही दिवसांच्या शांततेमुळे चर्चांचा उलगडा झाला आहे.
this is insane the simpsons predicted trump’s death to be on August 27th…. the last day he was seen in public
The Simpsons Curse. pic.twitter.com/7AIJvC9TmJ
— chartblaster (@chartblaster) August 30, 2025
credit : social media
या सगळ्या गदारोळाला अधिक धार देणारी गोष्ट म्हणजे ट्रम्प बेपत्ता होण्याच्या बातमीच्या आदल्या दिवशीच उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी एका मुलाखतीत दिलेले विधान. व्हान्स यांनी स्पष्ट केले की, जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत कोणतीही अनपेक्षित घटना घडली, तर ते राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यास पूर्णपणे तयार आहेत. यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आल्याचे त्यांनी उघड केले. व्हान्स यांनी जरी ट्रम्प निरोगी असून कार्यकाळ पूर्ण करतील असे म्हटले, तरी त्यांच्या विधानामुळे जनतेत आणि माध्यमांमध्ये शंका-कुशंकांना अधिक खतपाणी मिळाले.
Simpsons predicted Donald Trump died of heart attack in 2025 in a forgotten episode & that’s why Americans are searching “TRUMP IS DEAD”, “TRUMP DIED”, “Trump’s Health” & “Trump Is Dying”.#DonaldTrump #Trump #TrumpHealth #TrumpHealthCrisisCoverup #Simpsons #TrumpDead #TrumpDied pic.twitter.com/ZyJdSxdPrc
— Gulshan Sirohi (@SirohiGulshan) August 30, 2025
credit : social media
‘द सिम्पसन’ या कार्टून शोने भूतकाळात अनेक घटना अचूक भाकित केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे, ट्रम्प यांच्याबाबतच्या अफवा पसरताच या शोचा उल्लेख पुन्हा पुढे आला. सोशल मीडियावर अनेकांनी “सिम्पसनचे भाकित खरं होणार का?” असा सवाल उपस्थित केला. या कारणामुळे या अफवा अधिकच जोर धरू लागल्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tianjin Summit 2025 : 31 ऑगस्टपासून तियानजिनमध्ये मोठी तयारी; ‘आशिया आणि जगाचे भविष्य बदलणार’ पुतीन यांचा इशारा
अमेरिकन राजकारणात आधीच तणावाचे वातावरण आहे. ट्रम्प हे विवादास्पद निर्णय, कडक भाषणं आणि अनपेक्षित धोरणांमुळे सतत चर्चेत राहतात. मात्र यावेळी ते स्वतःच्या धोरणांमुळे नव्हे तर स्वतःच्या प्रकृतीबाबतच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. ट्रम्प यांच्या बेपत्ता होण्याच्या अफवेमुळे व्हाईट हाऊसपासून अमेरिकन जनतेपर्यंत गोंधळ निर्माण झाला आहे. एका बाजूला ट्रम्प यांच्या समर्थकांना ही बातमी स्वीकारणे कठीण जात आहे, तर दुसरीकडे विरोधक सोशल मीडियावर विविध दावे करत आहेत.
सध्याच्या घडीला अधिकृतरीत्या अशी कोणतीही माहिती नाही की डोनाल्ड ट्रम्प गंभीर आजारी आहेत किंवा खरोखरच बेपत्ता झाले आहेत. मात्र सोशल मीडियाच्या युगात अफवा किती जलद पसरू शकतात आणि त्यांचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.