Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei Still Alive: खामेनींचं पार्थिव गायब? 48 तासांनंतरही ना फोटो, ना अंत्यसंस्काराचा पत्ता; इराणच्या मौनामागे गुपित

Khamenei Funeral : खामेनी यांच्या मृत्यूला ४८ तासांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु त्यांच्या पार्थिवाचे कोणतेही फोटो प्रसिद्ध झालेले नाहीत किंवा त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल काहीही सांगितले गेले नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 02, 2026 | 12:37 PM
khamenei body missing mystery funeral suspense iran israel war updates

khamenei body missing mystery funeral suspense iran israel war updates

Follow Us
Follow Us:
  • गूढ वाढलं
  • ट्रम्प-नेतान्याहूंनी पाहिला मृतदेह
  • अंत्यसंस्काराचा सस्पेन्स

Khamenei funeral updates Tehran 2026 : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण जगाला एकाच प्रश्नाने ग्रासले आहे – ‘खामेनींचं पार्थिव नेमकं कुठे आहे?’ २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकन आणि इस्रायली हवाई हल्ल्यात खामेनी मारले गेले, या बातमीला ४८ तासांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप इराणच्या सरकारी माध्यमांनी त्यांच्या पार्थिवाचे कोणतेही दर्शन घडवलेले नाही. अंत्यसंस्काराबाबतचा हा सस्पेन्स आता जगभरातील गुप्तचर यंत्रणांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

हल्ल्याचा तो भीषण प्रसंग आणि ‘मोसाद’चा ताबा

‘खलीज टाईम्स’च्या वृत्तानुसार, ज्यावेळी खामेनी यांच्या निवासस्थानावर क्षेपणास्त्र धडकले, तेव्हा ते रिव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख मोहम्मद पाकपौर आणि सुरक्षा सल्लागार अली शामखानी यांच्यासोबत गुप्त बैठक घेत होते. हा हल्ला इतका भीषण होता की खामेनी यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, ‘कान मीडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर लगेचच इस्रायलच्या ‘मोसाद’ एजंटांनी त्या भागात प्रवेश मिळवून खामेनींचे पार्थिव ताब्यात घेतले, त्यांची आवश्यक कागदपत्रे तपासली आणि त्याचे फोटो पुराव्यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना पाठवले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Pakistan War: काश्मीरमध्ये भारत काय करतोय? ज्याला पाकिस्तान म्हणतोय ‘धोकादायक शस्त्र’; शाहबाज शरीफची पाचावर धारण

न्यू यॉर्क टाईम्सचा खळबळजनक दावा

‘न्यू यॉर्क टाईम्स’ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ढिगाऱ्यातून बाहेर काढलेलं खामेनींचं शरीर अत्यंत विकृत अवस्थेत होतं. या पार्थिवाचा फोटो काढून थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवण्यात आला. ट्रम्प आणि नेतान्याहू हेच अशा व्यक्ती आहेत ज्यांनी खामेनींचा शेवटचा चेहरा पाहिला असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्यानंतर हे पार्थिव इराणच्या ताब्यात दिले गेले की इस्रायलने ते गुप्तस्थळी हलवले, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

#Khamenei is still alive ? If so, is it the beginning of #WorldWar3 ? pic.twitter.com/uQ929xf8Th — Lepchas (@Lepchas_) March 1, 2026

credit – social media and Twitter

तेहरान की मशहद? अंत्यसंस्काराचा पेच

इराणमध्ये सध्या खामेनींच्या अंत्यसंस्कारावरून दोन प्रवाह पाहायला मिळत आहेत. १९८९ मध्ये इराणचे पहिले सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांना तेहरानच्या ‘बेहेश्त-ए-जहरा’ स्मशानभूमीत दफन करण्यात आले होते. त्यामुळे खामेनींचे दफनही तेथेच होईल, अशी एक शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे खामेनींचे मूळ गाव ‘मशहद’ येथे त्यांना दफन करण्याची मोठी मागणी होत आहे. मशहद हे शिया समुदायासाठी अत्यंत पवित्र ठिकाण असून, तिथेच त्यांचे जवळचे सहकारी इब्राहिम रईसी यांनाही दफन करण्यात आले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Israel Iran War: हिजबुल्लाहचा ‘राजकीय’ अंत! मोहम्मद राद इस्रायली हवाई हल्ल्यात ठार; IDFने प्रथमच केला ‘Iron beam’ने घातक प्रहार

युद्ध थांबेपर्यंत अंत्यविधी लांबणीवर?

एक धक्कादायक तर्क असाही लावला जात आहे की, इराण सध्या युद्धजन्य परिस्थितीत आहे. अशा वेळी लाखो लोकांची गर्दी झाल्यास इस्रायल पुन्हा हल्ला करू शकतो, अशी भीती इराणला आहे. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार पाच महिने लांबणीवर पडले होते. तोच कित्ता इराण खामेनींच्या बाबतीत गिरवण्याची शक्यता आहे. जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत खामेनींचे पार्थिव एखाद्या सुरक्षित बंकरमध्ये किंवा वातानुकूलित कक्षात ठेवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अयातुल्ला खामेनी यांच्या पार्थिवाचा फोटो अद्याप का प्रसिद्ध झाला नाही?

    Ans: सुरक्षा कारणास्तव किंवा पार्थिव विकृत झाल्यामुळे इराण सरकारने अद्याप फोटो प्रसिद्ध केले नसावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.

  • Que: खामेनींचे पार्थिव सर्वात आधी कोणी पाहिले?

    Ans: न्यू यॉर्क टाईम्सनुसार, इस्रायली मोसाद एजंट आणि त्यानंतर फोटोंच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प व नेतान्याहू यांनी त्यांचे पार्थिव पाहिले.

  • Que: खामेनींचे अंत्यसंस्कार कुठे होण्याची शक्यता आहे?

    Ans: तेहरानमधील बेहेश्त-ए-जहरा किंवा त्यांच्या मूळ गावी मशहदमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार होऊ शकतात.

Web Title: Khamenei body missing mystery funeral suspense iran israel war updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • iran

संबंधित बातम्या

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव
1

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’
2

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?
3

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत
4

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.