Storms dump nearly a year of rain in China
बीजिंग : गेल्या आठवड्यात शुक्रवारी झालेल्या पावसाने चीनमध्ये प्रचंड हाहा:कार माजवला आहे. चीनच्या अनेक भागांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने १६ पैकी १० जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाचा इशारा दिला दिला आहे. अनेक डोंगराळ भागांमध्ये अचानक पूर येण्याची शक्यता चीनच्या हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या चीनचे आद्योगिक शहर बाओडिंगनमध्ये परिस्थिती आणखी चिंताजनक आहे. येथे २४ तासांत सुमारे ४४८.७ मिमी पाऊस पडला आहे. संपूर्ण वर्षभारत पडणाऱ्या पावसाइतका आहे. सध्या चीनमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेली आहे.
मुसळधार पावसामुळे पूराची स्थिती उत्पन्न झाला आहे. यामुळे लोकांचे घरेही पाण्यात गेली आहे. काही गावांमध्ये परिस्थिती प्रचंड खराब असून १९,५०० लोकांना त्यांच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. या सर्वांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे.
चीनच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये देखील असाच प्रचंड पाऊस पडला होता. यामुळे शक्तिशाली वादळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली. यामुळे चीनच्या सरकारने आपत्कालीन पथकांना सुसज्ज राहण्यास सांगितले आहे. यामध्ये लोकांना केंद्र सरकारने २३ हजार मदत किट वाटले आहे. यात ब्लॅंकेट आणि काही आपत्कीन वस्तूंचा समावेश आहे.
सध्या चीनमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे बीजिंग किंवा बाओडिंगच्या भादात हंगामी वादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाचा जोर वाढत असून संरक्षण यंत्रणेला देखील लोकांच्या मदतीत अडथळे येत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर लाखो लोक बेघर होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक हवामान बदलामुळे चीनच्या उत्तरेकडे अनेक कोरड्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. २०२३ पेक्षा यावर्षी २६ % पाऊस जास्त पडला आहे. यामुळे चीनमधील अनेक लोक पूर, भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्तींना बळी पडण्याची शक्यता आहे.
सध्या सरकारने लोकांना सुरक्षित ठेकाणी जाण्याचे आणि आपत्कालीन पथकांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. डोंगराळ आणि भूस्खलनाच्या भागातील लोकांना सध्या सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.