Sunita Williams' Crucial Research During Nine Months in Space
नवी दिल्ली: अखेर 9 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर इतर दोन अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले आहे. दोन्ही अंतराळवीर 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून आठ दिवसांच्या मोहीमेवर अंतराळ स्थानकावर गेले होते. मात्र, बोईंग अंतराळयानाच्या तांत्रिक बिघाडीमुळे त्यांचा हा प्रवास लांबवणीवर पडला. नासा आणि एलॉन मस्कच्या SpaceX च्या अंतराळयानाने त्यांना सुरक्षित परत आणण्यात आले. भारतीय वेळेनुसार, बुधवारी पहाटे (19 मार्च) 3.30 वाजता अमेरिकेच्या फ्लोरिडाजवळील समुद्रात स्पेसक्राफ्ट लॅंड झाले आणि त्यांना सुरक्षित बाहरे काढण्यात आले.
या 9 महिन्यांदरम्यान सुनीता विल्यम्स आणि बुच यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर कार्य केले. आज आपण याबद्दल जाणून घेऊयात.
सुनीता विल्यम्सच्या अडचणी काही थांबेना! लॅंडिंगवेळी पृथ्वीवर येताना अंतराळयानाचा होऊ शकतो स्फोट?
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्माेर यांनी अनेक संशोधन प्रकल्प आणि वैज्ञानिक प्रयोग पूर्ण केले.
अंतराळ स्थानकाची देखभाल आणि सुधारणेवर त्यांनी काम केले. अंतराळ स्थानक हा फुटबॉल मैदानाएवढा मोठा असून त्याच्या नियमित देखभालीची गरज असते ती दोघांनी पूर्ण केली.त्यांनी जुन्या उपकरणांचे नूतनीकरण आणि अंतराळ स्थानकाची स्वच्छता केली. त्यांनी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विविध यंत्रमांवर काम केले.
या प्रकल्पांवर काम
नासाने दिलेल्या माहितीनुसार, या दरम्यान सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 150 हून अधिक वैज्ञानिक प्रयोगावर काम केले. यामध्ये गुरुत्वाकर्षाचा द्रवपदार्थांवर होणार परिणाम, नवीन रिऍक्टरचा विकास आणि अंतराळात पोषणत्तेव तयार करण्याच्या बायोन्यूट्रियंट प्रकल्पावर काम केले.
स्पेसवॉक विक्रम
सुनीता विल्यम्स यांनी 9 वेळा स्पेसवॉकचा विक्रम करत 62 तास 9 मिनिटे अंतराळस्थानकाच्या बाहेर घालवले. विल्यम्स यांनी अंतराळात सर्वात जास्त वेळ घालवमाऱ्या महिलांच्या विक्रमात आपले स्थान कायम केले.
नवीन रिऍक्टर आणि पाणी वापराचा शोध
विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवीन उर्झा प्रणाली आणि पाण्याच्या पुनर्वापरावर संशोधन केले. अंतराळात पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल यावर भर देण्यात आला. यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिम सोप्या होेतील.
बायोन्यूट्रिएंट्स प्रकल्पावर कार्य
या प्रकल्पांतर्गत अंतराळवीरांना ताजे पोषक तत्त्व उपलब्ध करून देण्यासाठी जीवाणूंच्या मदतीने पोषणतत्त्व तयार करण्याचा प्रयोग त्यांनी केला.
भविष्यात या सर्व गोष्टी अंतराळ मोहिमांसाठी उपयुक्त ठरतील.सुनीता विल्यम्स यांचा हा 9 महिन्यांचा प्रदीर्घ प्रवास खडतर असला तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तो अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यांच्या योगदानामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमा अधिक यशस्वी होतील.
NASA सुनीता विल्यम्स यांना किती पगार देतो? 9 महिन्यांच्या ओव्हरटाईम मिळणार का?