Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत अमेरिकेत TikTok वर बंदी; आता युजर्सच्या ट्रम्प यांच्यावर नजरा

TikTok या शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्मने अमेरिका मधील आपले कार्य पूर्णतः थांबवले असल्याची माहिती समोर आली आहे. 17 जानेवारी 2025 रोजी, अमेरिकी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत TikTok वर बंदी घातली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 19, 2025 | 01:10 PM
Supreme Court banned TikTok in US citing national security

Supreme Court banned TikTok in US citing national security

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: TikTok या शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्मने अमेरिका मधील आपले कार्य पूर्णतः थांबवले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी 2025 रोजी, अमेरिकी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव TikTok वर बंदी घालणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली. यामुळे आता अमेरिकेतील नागरिक या अ‍ॅपचा वापर करू शकणार नाहीत. Apple Hub च्या माहितीनुसार, TikTok अ‍ॅप अमेरिकेच्या अ‍ॅप स्टोअरमधून देखील हटवण्यात आले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेमुळे निर्णय

अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, TikTok संदर्भात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित चिंता व्यक्त केल्या जात होत्या. त्यांचा दावा होता की, चीनी सरकार TikTok च्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांवर नजर ठेवू शकते किंवा त्यांच्या मतांवर प्रभाव टाकू शकते. FBI चे संचालक क्रिस्टोफर रे यांनी सांगितले की, चीनी सरकार TikTok च्या सॉफ्टवेअरद्वारे अमेरिकन डिव्हाइसेसवर अनधिकृत प्रवेश मिळवू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार? चीनलाही भेट देण्याची आहे योजना

याच सुरक्षाविषयक चिंतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन काँग्रेसने TikTok वर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एप्रिल 2024 मध्ये या कायद्यावर स्वाक्षरी केली होती. TikTok ची मूळ कंपनी बाइटडांसने या निर्णयाविरोधात कोर्टात आव्हान दिले, परंतु सुप्रीम कोर्टाने या अपीलला फेटाळून लावले. अखेर, 19 जानेवारी 2025 पासून TikTok अमेरिका मधील आपली सेवा बंद करणार आहे.

ट्रम्प देऊ शकतात 90 दिवसांची मुदतवाढ

अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, ते TikTok ला 90 दिवसांची मुदतवाढ देऊ शकतात. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय त्यांनी अद्याप घेतलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. ते सध्या राजधानी वॉशिंग्टन येथे पोहोचले असून, त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात TikTok वर काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मस्क होणार टिक-टॉक चे मालक? 

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत TikTok वर बंदी लादली जाण्याच्या शक्यतांदरम्यान चीनकडून एक चकित करणारी बातमी समोर आली होती. TikTok ची मूळ कंपनी TikTok हे व्यासपीठ एलॉन मस्क यांना विकण्याचा विचार करत होते. चीनी अधिकाऱ्यांची प्राथमिकता टिकटॉक ला ByteDance च्या नियंत्रणाखाली ठेवण्याची आहे. मात्र, अमेरिकेत TikTok वर बंदी लावण्यात आल्यास एलॉन मस्क यांच्यासोबत व्यवहार होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात होते. यामुळे आता  अमेरिकेत TikTok वर बंदी घालण्यात आली असून एलॉन मस्क टिक-टॉकचे नवे मालक होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

2020 पासून भारतात TikTok बॅन

याशिवाय, TikTok वर 29 जून 2020 पासून भारतात देखील बंदी घालण्यात आली होती. ही बंदी, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि डिजिटल गोपनीयतेला असलेल्या धोक्याच्या कारणास्तव लागू करण्यात आली होती. भारत सरकारने या अ‍ॅपला 58 इतर चिनी अ‍ॅप्ससह बॅन केले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अटकेनंतर न्यायालयाबाहेर गोंधळ; समर्थकांकडून निदर्शने

Web Title: Supreme court banned tiktok in us citing national security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US
  • World news

संबंधित बातम्या

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
1

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
2

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
3

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
4

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.