लंडनमधील अमेरिकन दूतावासाजवळ संशयास्पद स्फोट; घटनेचा तपास सुरू
इंग्लंड: लंडनमधील अमेरिकन दूतावासाजवळ संशायास्पद स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. लंडनच्या मेट्रोपॉलिन पोलिसंनी या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात त्यांना एक संशयास्पद पॅकेड असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचण्या आधीच हा स्फोट झाला. या घटनेननंकर गॅटविक विमानतळ तात्काळ रिकामे करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी सांगितली. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.
घटनेचा तपास सुरू
लंडनच्या युएस दूतावासाने म्हटले की, ‘स्थानिक अधिकारी यूएस दूतावासाच्या बाहेर संशयास्पद पॅकेजची तपासणी करत आहेत. तसेच पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, खबरदारी म्हणून दूतावासाच्या पश्चिमेकडे रस्ते बंद करण्यात आले आहेत. लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिस सेवेने या घटनेचा तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र, हा स्फोट कोमी केला यामागाचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अमेरिकन दूतावासाने सर्व भेटी रद्द केल्या
अमेरिकन दूतावासाने या हल्ल्यानंतर सर्व भेटी रद्द केल्या होत्या. एक्सवर त्यांनी 22 नोव्हेंबरच्या सर्व भेटी व्हिसा अपॉइंटमेंट, पासपोर्ट अपॉइंटमेंट आणि इतर यूएस नागरिक सेवा रद्द केल्याची माहिती दिली होती. तसेच, रीशेड्यूल करण्यासाठी अर्जदारांशी ईमेलद्वारे संपर्क साधला जाईल असेही म्हटले.
Local authorities are investigating a suspicious package outside the U.S. Embassy in London. Met Police are present and have closed Ponton Road out of an abundance of caution. We will provide further updates when available. Please monitor @metpoliceuk for updates.
— U.S. Embassy London (@USAinUK) November 22, 2024
पोलिस अधिकाऱ्यांचे मानले आभार
यूएस दूतावासाने मेट पोलिसांचे आभार मानले, “तुमच्या तत्पर कारवाईबद्दल धन्यवाद आणि या वेळी तुमच्या सहकार्य आणि संयमासाठी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो.
The US Embassy is back to normal business operations, with the exception that all public appointments (visa appointments, passport appointments, and other American Citizen services) for 22 November have been cancelled. Applicants will be contacted via email to reschedule. Local…
— U.S. Embassy London (@USAinUK) November 22, 2024